नागपूर : शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या १०४ लोकांवर मनपाच्या उपद्रव शोधपथकाने कारवाई करून ६०५०० रुपयांचा दंड वसूल केला. रस्त्यावर खर्रा खाऊन थुंकल्या प्रकरणी ३ लोकांवर कारवाई करून ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, भाजी विक्रेते अशा २५ लोकांवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकला होता. तर ४ दुकानदारांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने कारवाई करून १६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
एका दवाखान्यावरही कारवाई करून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृह, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालय यांनी रिकाम्या जागेत कचरा टाकल्या प्रकरणी ४ कारवाया करण्यात आला. ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मंडप टाकून वाहतूकीचा रस्ता अडविल्याने ३ जणांवर कारवाई करून ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर प्रतिबंधक प्लास्टीकचा वापर करणारे, रस्त्याच्या कडेला बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्या बिल्डरविरुद्धही कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत ताज क्लिनिक हंसापुरी यांनी बायो मेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकल्याने ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.