लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांनी सोमवारी मास्क न लावणाऱ्या ५०१ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाखाचा दंड वसूल केला. मागील चार दिवसात शोध पथकांनी १,१३६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून २ लाख २७ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव व मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी वारंवार केल्या आहेत. परंतु नागरिक सूचनांचे पालन करीत नसल्याने शोध पथकाच्या जवानांनी कारवाई करुन दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे.मनपा मुख्यालय परिसरात सात जणांविरुध्द सोमवारी शोध पथकाचे प्रमुख वीरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आलीझोननिहाय करण्यात आलेली कारवाईलक्ष्मीनगर- २६धरमपेठ- १०२हनुमाननगर- ४३धंतोली - ५२नेहरुनगर - ४०गांधीबाग- ३८सतरंजीपुरा - १८लकडगंज- ५०आशीनगर - ६२मंगळवारी - ६३मनपा मुख्यालयात - ७
नागपुरात मास्क न लावणाऱ्या १,१३६ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 1:07 AM