नागपूर : शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या ८३ जणांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ५३ हजाराचा दंड वसूल केला आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी २७ लोकांवर कारवाई करून १०८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १२ दुकानदारांवर कारवाई करून ४८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहतूकीचा रस्ता मंडप टाकून अडविल्या प्रकरणी १४ लोकांवर कारवाई करून १९५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एका सभागृहाने कचरा रस्त्यावर टाकल्याने १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गांधीबाग व मंगळवारी झोन अंतर्गत ४ आस्थापनांवर प्रतिबंधात्मक प्लास्टीकची विक्री केल्या प्रकरणी २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. एका रुग्णालयाने हॉस्पीटलचा कचरा रस्त्यावर टाकल्या प्रकरणी ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत झाडे तोडून रस्त्यावर फांद्या पसरविल्याने ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मार्डन स्कुल पोलीस लाईन टकाळी जाफरनगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्याने ५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.