लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विनाकारण शहरात फिरून कोरोना संसर्गाचा धोका वाढविणाºया ९९९ बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. त्यात ९७२ बेशिस्त वाहनचालक आणि २७ रिकामटेकड्या नागरिकांचाही समावेश आहे.शहरातील वर्दळ, गर्दी वाढल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. अनावश्यक फिरणाºयावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक बेजबाबदार आणि बेशिस्त वाहनचालक बिनधास्तपणे शहरात फिरत आहेत. विविध कामाचे निमित्त करून ही मंडळी इकडे तिकडे फिरत असल्याने सर्वत्र गर्दी वाढली आहे. कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.पोलिसांनी थांबवून विचारपूस केल्यास असंबद्ध कारण सांगून रिकामटेकडे निसटण्याचा प्रयत्न करतात. अनेकांजवळ वाहनाची कागदपत्रे लायसन्स देखील रहात नाही. अनेक जण बॅरिकेट लावून असल्याने पोलिसांना पाहून बाजूच्या गल्लीतून पळून जातात. अशा एकूण ९९९ जणांना शनिवारी दिवसभरात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात ९७२ वाहनचालकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार कारवाई केली आहे.
नागपुरात लॉकडॉऊनचे उल्लंघन करणाऱ्या ९७२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:50 PM