नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्या, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ८३ उपद्रवींवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ५९१०२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक जागेवर पान, गुटखा खाऊन थुंकल्या प्रकरणी ४ लोकांवर कारवाई करून ८०० रुपये दंड वसूल केला आहे.
हाथगाड्या, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या सार्वजनिक परिसरात कचरा टाकल्याने ३० लोकांवर कारवाई करून १२ हजार रुपये दंडाची वसूल करण्यात आली. १० मोठ्या दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज आदी टाकून अडविल्या प्रकरणी ७ जणांवर दंडात्मक कारवाई करून २३५०० रुपये वसूल करण्यात आले.