लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कुठल्याही बिलींग कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट संकेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.कामचुकार मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महावितरणने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे, वीजवापरानुसार योग्य व अचूक वीजबिल ग्राहकांना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मीटर रीडिंगच्या प्रक्रियेत कोणतीही हयगय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केल्या जाईल. असेही खंडाईत यांनी यावेळी सांगितले, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्र्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळातील सर्व वरिष्ठ अभियंते, मानव संसाधन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, वित्त व लेखा विभाग आणि जनसंपर्क विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांनी एप्रिल पासून लागू होणाऱ्या नवीन बिलिंग प्रणालीवर विस्तृत प्रकाश टाकला. तसेच होणाऱ्या खर्चात कपात करण्यासंबंधीच्या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले. याशिवाय प्रभारी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित विविध विषयांवरील सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्य अभियंते रफिक शेख, सुहास रंगारी, अरविंद भादीकर, दिलीप घुगल, सुहास मेत्रे आणि सुरेश मडावी, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, आणि पाचही परिमंडळातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंत्यांसह मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी उपस्थित होते.
वीज मीटरचे रीडिंग चुकल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 8:58 PM
‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कुठल्याही बिलींग कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट संकेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे.
ठळक मुद्देनागपूर परिक्षेत्र आढावा बैठक : भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश