लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मुख्याध्यापकाकडूनच कॉपी पुरविण्यात येत असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून मंगळवारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळा खापरी रेल्वे येथे रविवारी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प. शाळा खसरमारीचे मुख्याध्यापक किशोर आंबटकर हे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवित होते. यासंदर्भात पालकांनी आक्षेप घेत, त्यांची तक्रार केंद्र प्रमुखाकडे केली होती. पालकांच्या तक्रारीवरून हा संपूर्ण प्रकार लोकमतने उघडकीस आणला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी लोखंडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, गटशिक्षण अधिकाºयाच्या माध्यमातून केंद्र प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, परीक्षक यांची चौकशी सुरू आहे. केंद्र प्रमुखांनी पालकांना लिहून दिलेल्या अहवाल ताब्यात घेण्यात आला आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.यासंदर्भात पालकांनी केलेल्या तक्रारीत कॉपी पुरविण्यात आंबटकर यांना केंद्र प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक व परीक्षक यांचेही सहकार्य मिळाले होते. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली होती. तसेच या केंद्रवरील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली होती. मंगळवारी या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात हे बघणे महत्वाचे ठरेल.
नागपुरात कॉपी पुरविणाऱ्या मुख्याध्यापकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:10 PM
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मुख्याध्यापकाकडूनच कॉपी पुरविण्यात येत असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून मंगळवारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
ठळक मुद्देप्रकरणाची गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी : मंगळवारपर्यंत मागितला अहवाल