लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असल्याने लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.नागपूर शहरासाठी हा प्रश्न सध्या गंभीर असून यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक समिती बनवून याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. या विषयाच्या अभ्यासाअंती गंभीर बाबी समोर आल्या आहेत.गडरलाईनवरील अतिक्रमण ही शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईनवर केलेल्या पक्क्या बांधकामामुळे दुरुस्तीचे कामे होऊ शकत नाही. त्यात अडथळे निर्माण होत आहे. शहरात सुमारे २७५ पेक्षा अधिक ठिकाणी पक्की घर बांधली, गडरलाईन कव्हर करणे, वऱ्हांडा बांधणे अशी कामे नागरिकांनी केली आहेत. यामुळे चोकेज काढता येत नाही. पाऊस आला की चोकेजमुळे घाण पाणी बाहेर पडते आणि घरांमध्ये शिरते.नाल्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती आहे. ७० पेक्षा अधिक भागांमध्ये नाल्यांमध्ये काँक्रिटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, नाल्याकाठी सोसायटी उभारणाऱ्या बिल्डरने नाल्याची भिंत उंच करणे, नाल्याची जागा बळकावून आत बांधकाम करणे आणि नाल्याचा प्रवाह वळविणे, असे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. शहरात २२७ नाले आहेत. परंतु आता ही संख्या १३० च्या आसपास आल्याचे तीन महिन्यांच्या अभ्यासात लक्षात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून आता याविरोधात मोहीमच उघडण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.अतिक्रमण काढा अन्यथा कारवाई!ज्यांनी गडरलाईनवर, नाल्यांवर जेथे कुठे अतिक्रमण केले आहेत, पिलर्स उभारले आहेत, त्यांनी तातडीने अतिक्रमणे काढावीत, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
नाला आणि गडरलाईनवरील अतिक्रमणावर होणार कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 9:23 PM
शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे कारण असल्याने लवकरच अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे निर्देशदुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी मोठा अडथळा