लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर पंचकर्म उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे येथील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विलास उजवणे यांना ९ मे २०१७ रोजी ‘ब्रेन स्ट्रोक’चा ‘अटॅक’ आला. त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही दिवस येथील उपचारानंतर ते चालायला-फिरायला लागले. परंतु, त्यांना पंचकर्म घ्यायचे होते, यामुळे त्यांनी नागपुरातील सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याची सूचना कुटुंबीयांना केली. १० जानेवारीला डॉ. उजवणे यांना नागपुरात आणले. ते रुग्णालयात भरती नसले तरी रोज त्यांच्यावर पंचकर्म सुरू आहेत. या उपचारामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुईस जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उजवणे यांच्यावर उपचार सुरू असून, डॉ. बोंबार्डे व डॉ. बाबर हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आणखी १५ ते २० दिवस डॉ. उजवणेंवर पंचकर्म उपचार चालणार असल्याचे डॉ. लुईस जॉन यांनी सांगितले. डॉ. उजवणे सध्या नागपुरातील त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले आहेत. डॉ. उजवणे हे १९८३ च्या बॅचचे नागपूरच्याच आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
अभिनेते विलास उजवणे यांच्यावर नागपुरात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:06 PM
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर पंचकर्म उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे येथील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देप्रकृतीत सुधारणा : शासकीय आयुर्वेद रुग्णालयातून घेत आहेत पंचकर्म