लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तेलंगी जात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास असून २०० वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे तेलंगी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावा, तेलंगी जातीच्या ज्या व्यक्तीकडे जाती प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे शैक्षणिक व महसुली पुरावे नाहीत, अशा व्यक्तींना दाखले देण्यासाठी अ. भा. तेलंगी समाज संघर्ष समिती अमरावतीला प्राधिकृत करण्यात यावे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय तेलंगी समाज संघर्ष समितीने यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढला. पोलिसांनी मॉरेस टी पॉर्इंट येथे हा मोर्चा अडविला. मोर्चातील तेलंगी समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करीत शासनाने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मोर्चातील शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी तेलंगी जातीचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. या मोर्चाचे नेतृत्व सचिन डाके, लक्ष्मीकांत येसूर, नरेश मूर्ती, भालचंद्र कुर्तकोटी, सुनील मिद्दे, नंदुअण्णा तेंदुलकर, रमेश कटुके, प्रदीप आधारे यांनी केले .
तेलंगी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 11:35 PM
तेलंगी जात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास असून २०० वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे तेलंगी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावा, तेलंगी जातीच्या ज्या व्यक्तीकडे जाती प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे शैक्षणिक व महसुली पुरावे नाहीत, अशा व्यक्तींना दाखले देण्यासाठी अ. भा. तेलंगी समाज संघर्ष समिती अमरावतीला प्राधिकृत करण्यात यावे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय तेलंगी समाज संघर्ष समितीने यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढला.
ठळक मुद्देअखिल भारतीय तेलंगी समाज संघर्ष समितीचा मोर्चा