लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन ‘अनलॉक’ होताच रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे मोठा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. आज ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ११४२ वर पोहचली असून छत्रपतीनगर, पंचशीलनगर व गणेशपेठ येथील रजत कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. विदर्भातील ११ जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु उपराजधानीचा दर्जा व लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फार कमी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर, १.५७ आहे. मेयो, मेडिकलमध्ये भरती असलेल्या रुग्णांमधील ९८ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत ७७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.एम्स २२, माफसू ४, मेयोमधून २ रुग्ण पॉझिटिव्हअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात हिंगणा अमरनगर येथील आठ, चंद्रमणीनगर येथील आठ, काटोल येथील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण सिम्बॉयसिस येथे क्वारंटाईन होते. उर्वरीत दोन रुग्ण हे आमदार निवास व वनामती येथे क्वारंटाईन होते. मेयोच्या प्रयोगशाळेत दोन रुग्णांचे निदान झाले. यात गणेशपेठ येथील रजत कॉम्प्लेक्समधील एक रुग्ण आहे. या वसाहतीत पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली तर दुसरा रुग्ण लष्करीबाग येथील आहे. मेडिकलमधील एक रुग्ण हा मंगलमूर्ती येथे क्वारंटाईन होता. माफसूच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होते. यातील एक रुग्ण पंचशीलनगर वसाहतीतील आहे. खासगी प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्ण छत्रपतीनगर येथील आहेत. एका रुग्णाची माहिती समोर आली नाही.चंद्रमणीनगर नवे हॉटस्पॉट२५ रुग्ण सतरंजीपुरा, मोमीनपुरा, टिमकी, बांग्लादेश-नाईक तलावनंतर आता चंद्रमणीनगर नवे हॉटस्पॉट ठरत आहे. गुरुवारी या वसाहतीतून आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील सात रुग्ण एकाच घरातील आहेत. येथील रुग्णांची संख्या २५वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मनपाचे धंतोल झोन या भागात विशेष परिश्रम घेत आहे.मेडिकलमधून ४६ तर मेयोतून ३० रुग्ण बरेमेडिकलमधून ४६ रुग्ण बरे झाले. यात बांगलादेश, नाईक तलाव येथून ४० रुग्णांचा समावेश आहे. उर्वरीत रुग्ण हंसापुरी, हिंगणा येथील लोकमान्यनगर येथील आहेत. मेयोतून ३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात बांगलादेश, नाईक तलाव येथील २१, मोमीनपुरा येथील ५, भारतनगर येथील १, भीमनगर येथील २ तर गांधीबाग येथील १ रुग्णाचा समावेश आहे. तर एम्समधून एका रुग्णाला सुटी देण्यात आली.दैनिक संशयित १९६दैनिक तपासणी नमुने ४४१दैनिक निगेटिव्ह नमुने ४११नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ११४२नागपुरातील मृत्यू १८डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ७७०डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३६७१क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २४१७पीडित- ११४२-दुरुस्त-७७०-मृत्यू-१८
नागपुरात कोरोनाच्या ३३ रुग्णांची भर : ६७ टक्के रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:42 PM
लॉकडाऊन ‘अनलॉक’ होताच रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ६७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे मोठा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. आज ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली.
ठळक मुद्दे७७ रुग्णांना डिस्चार्ज : छत्रपतीनर, पंचशीलनगर, गणेशपेठ संकुलमध्ये कोरोनाचा शिरकाव