शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

'नासुप्र'मध्ये अतिरिक्त प्रीमियम घोटाळा; दंडाऐवजी वर्ल्ड ट्रेड सेंटरला १५ कोटींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:03 PM

विकास ठाकरे यांचा आरोप: विश्वस्त मंडळाचा निर्णय नियमबाह्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २३ जुलै २०२४ रोजी विकासक गोयल गंगा ग्रुप यांना अतिरिक्त प्रीमियर परत करण्याचा व सीताबर्डी येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने नासुप्रला १५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा मोठा घोटाळा असल्याने नासुप्रने हा प्रस्ताव रद्द करून जमीन ताब्यात घ्यावी. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि गोयल गंगा ग्रुपला काळ्या यादीत टाकावे आणि मोठ्या दंडाची वसुली करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

विकासक गोयल गंगा ग्रुप यांनी सीताबर्डी येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम निर्धारित कालावधीत केलेले नाही. नासुप्रच्या जमीन वाटपाच्या नियमाच्या कलम १७ नुसार लीजधारकाने प्लॉटच्या ताब्यापासून एक वर्षाच्या आत इमारतीचे बांधकाम सुरू करणे आवश्यक होते. परंतु, या कालावधीत बांधकामाला सुरुवात न केल्याने नासुप्रने लीज रद्द करून जमीन आपल्या ताब्यात घेणे अपेक्षित होते. सभापतींनी अतिरिक्त प्रीमियम वसूल करून २०१४ पर्यंत बांधकामाला मुदतवाढ दिली. त्यानंतरही बिल्डरला वर्षभरात बांधकाम करता आले नाही. त्यानंतर बांधकामासाठी मुदतवाढ देणे अपेक्षित नसतानाही वेळोवेळी नासुप्रने मुदतवाढ दिली. हे नासुप्र कायदा व जमीन वाटप नियम व लीज दस्त ऐवजाचे उल्लंघन आहे. ही एक  मोठी अनियमितता असून, बिल्डरला लाभ व्हावा, या हेतूने हा निर्णय घेतल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला आहे. 

प्रस्ताव सर्वसमावेशक व नियमानुसार"विकासकाने सर्वसमावेशक प्रस्ताव सादर केला आहे. सर्व तथ्य रेकॉर्डवर ठेवत नासुप्रकडे कायद्यानुसार प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर विस्तृत चर्चा केल्यानंतर नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने ठराव पारित केला आहे. आम्ही नागपूरच्या विकासासाठी आणि सीताबर्डी येथील अत्याधुनिक अनोख्या व्यावसायिक संकुलासाठी वचनबद्ध आहोत. यातून व्यापाराला चालना मिळेल आणि सर्वांना खरेदीचा आगळावेगळा अनुभव मिळेल."- अनुप खंडेलवाल, उपाध्यक्ष, गोयल गंगा ग्रुप 

टॅग्स :nagpurनागपूर