आमदार कोहळेंनी जोपासली सामाजिक बांधिलकी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारण्यांचे वाढदिवस कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरे करीत असतात. हारतुरे यावर प्रचंड खर्च होत असतो. परंतु सामाजिकतेची जाणीव ठेवून आपल्या वाढदिवसातून समाजाचाही काही फायदा व्हावा, असा उद्देश बाळगणारे आमदार सुधाकर कोहळे यांच्यासारखे मोजकेच. आ. कोहळे यांच्या पुढाकारामुळे त्यांच्या वाढदिवसाला तब्बल ३० हजारावर वह्या भेटस्वरूपात जमा झाल्या. या सर्व वह्या आता दक्षिण नागपुरातील मनपा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वितरित केल्या जात आहेत. आ. कोहळे यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना कुणीही पुष्पगुच्छ व इतर सामग्री भेट म्हणून आणण्यापेक्षा गरीब व होतकरू मुलांना शिक्षणासाठी आवश्यक अशा वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आदी वस्तू भेट द्यावी, असे आवाहन खुद्द आ. सुधाकर कोहळे यांनी कार्यकर्ते व नागरिकांना केले होते. या आवाहनाला कार्यकर्ते आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोहळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आणि नागरिक आपल्यासोबत वह्या-पुस्तक घेऊन आले होते. दिवसभरात तब्बल ३० हजारावर वह्या-पुस्तक व शालेय सामग्री भेटस्वरूपात गोळा झाली. यावेळी आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मनपा सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्वाती आखतकर, माधुरी प्रवीण ठाकरे, मंगला शशांक खेकरे, रिता मुळे, वंदना भगत, दिव्या धुरडे, पल्लवी श्यामकुळे, चेतना टांक, नगरसेवक अभय गोटेकर, नरेंद्र बाल्या बोरकर, राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, माजी नगरसेवक रमेश सिंगारे, संजय ठाकरे, विलास करांगळे, प्रशांत कामडी, किशोर पेठे, सुनील मानेकर, नानाभाऊ आदेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दुर्गानगर मनपा शाळेला ११११ वह्या-पुस्तके भेट वाढदिवसानिमित्त मिळालेल्या ३० हजारावरील वह्या-पुस्तके दक्षिण नागपुरातील मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. याची सुरुवात दुर्गानगर मनपा शाळेतून करण्यात आली. या शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल ११११ वह्या-पुस्तके भेट देण्यात आली. बुके नव्हे बुक नागरिकांनी वाढदिवस असो की कुठलाही कार्यक्रम असो कुणाला भेट देतांना बुकेऐवजी (बुक) पुस्तके भेट द्यावी. फुलांचे बुके हे काही वेळानंतर कोणत्याच कामात येत नाही. परंतु वह्या-पुस्तके भेट दिली तर ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या कामात येतील. - आ. सुधाकर कोहळे शहराध्यक्ष, भाजपा नागपूर
मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना देणार ३० हजारावर वह्या
By admin | Published: July 03, 2017 2:36 AM