शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आदिवासी हे मूळनिवासीच आहेत

By admin | Published: October 25, 2015 2:50 AM

भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते ते मूळनिवासी आहेत.

मान्यवरांचा सूर : ‘आदिवासी : मूळनिवासी, हिंदू की वनवासी’ विषयावर चर्चा नागपूर : भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते ते मूळनिवासी आहेत. त्यामुळे आदिवासींना मूळनिवासीच समजले जावे, अशी आग्रही भूमिका व्यक्त करतानाच हिंदू म्हणून त्यांच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करू नये. आदिवासींवर हिंदू धर्म लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो आदिवासींना अमान्य आहे. आदिवासींचा धर्म हिंदू नाही, त्यांचा धर्मच नाही. आदिवासी हे मूळनिवासीच आहेत, असा सूर चर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘आदिवासी कोण : मूळनिवासी, हिंदू की वनवासी’ विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील चिंतनकक्षात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठानचे सरचिटणीस रमेश बोरकुटे, सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. या चर्चेत आदिवासी समाजातील कार्यकर्ते, युवा आणि नेत्यांनीही सहभाग नोंदवित हिरीरीने मते व्यक्त केली. आदिवासींची संस्कृती, धर्म, परंपरा, हक्क याबाबत वेगवेगळी विधाने केली जातात. न्यायालयाने आदिवासींचा धर्म हिंदू नाही, असा निर्णय दिलेला असतानाही त्यांच्यावर हिंदू धर्म थोपविला जातो. त्यांना वनवासी म्हटले जाते. मुळात आदिवासी हिंदूही नाहीत आणि वनवासीही नाहीत तर ते मूळनिवासी आहेत. डॉ. विनायक तुमराम म्हणाले, आदिवासींची ओळख दिली तर आदिवासींवर आक्षेप घेतले जातील वा न्याय मिळेल. परिस्थितीशी आणि निसर्गाशी जुळवून घेत जगण्याचे मार्ग शोधले तो माणूस म्हणजेच मूळनिवासी आहे. त्यामुळे आदिवासी हे मूळनिवासी आहेत. त्यामुळे हिंदू वा वनवासी असल्याचा प्रचार चुकीचा आहे. ज्यांनी आम्हाला वनवासी ठरविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापासून सावध होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एल. के. मडावी म्हणाले, आमच्या साऱ्याच परंपरा आणि जगण्याची शैली, रीतीरिवाज वेगळे आहेत. मूळनिवासी म्हणून आमच्यावर अत्याचार केले जातात आणि मूळनिवासी असण्याचा दर्जाही दिला जात नाही. वनवासी म्हणून आमच्या हक्कांवरच गदा आणली जात आहे. आमचा धर्म फक्त आदिवासी आहे. हिंदू नाही. त्यासाठी सर्व आदिवासींचे एकत्रिकरण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयानुसार आदिवासी हिंदू नाहीत. त्यांना वनवासी म्हणणे म्हणजेच कागदोपत्री संपविण्याचा प्रयत्न आहे. आदिवासींवर सातत्याने अन्याय आणि अत्याचार करण्यात आला. त्यांच्या हक्कांना डावलण्यात आले. जातीच्या भरवशावर त्यांचे अधिकार नाकारण्यात आले. आता वनवासी, आदिवासी अशा भ्रमात आदिवासींची संस्कृती संपविण्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सारा आदिवासी समाज एकत्र होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या चर्चासत्रात विनोद मून, श्रीधर जोशी, कृष्णा पेंदास, सिद्धार्थ खोब्रागडे, श्रीराम बढे, वि. दे. ओरके, सुजित जाधव, जे. एन. भोरजार, यशवंत घुमे, लक्ष्मण शेडाम, बाबासाहेब कंगाले, सागर खादीवाला, धनंजय मांडवकर, माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब कंगाले, सुवर्णा वरखडे आदींनी मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)