नागपूर : शहरातील तलाव आणि नाल्यांच्या सफाईबाबत प्रशासन गंभीर नाही. परिणामत: शहरातील सर्वच तलावांची आज दुर्दशा झाली आहे. सक्करदरा तलाव, लेंडी पूर्णत: आटला आहे. मनपा प्रशासन या संदर्भात कधीच गंभीर नव्हते. सक्करदरा तलावात जलकुंभी व्यापली असूनही तलावाची सफाई झाली नाही. शहरातील सर्वच तलाव आणि नाल्यांचे हेच हाल आहेत.
सक्करदरा तलावासारखाच लेंडी तलावही पूर्ण आटला आहे. येथे तलाव होता, यावर विश्वास बसू नये, अशी परिस्थिती झाली आहे. मागील पाच वषरात सफाईच झाली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हळूहळू जलकुंभी वाढत गेली.
...
पोलीस लाईन टाकळी तलावाला ५० लाखांचा निधी
पोलीस लाईन टाकळी तलावाच्या सफाईसाठी सरकारने ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. पण काम सुरू झालेच नाही. अनेक वर्षापासून येथेही सफाई न झाल्याने जलकुंभी वाढली आहे. लॉकडाऊनचे कारण सांगून मनपा प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दोन महिन्यांपूर्वी कामाचे भूमिपूजन झाले, मात्र कामाचा पत्ता नाही.
...
परिसराची स्वच्छता नाही
सक्करदरा तलाव, फुटाळा तलाव, गांधी सागर तलाव, नाईक तलाव येथील परिसराची सफाईच होत नाही. तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. नागरिक तलावात निर्माल्य विसर्जित करतात. सायंकाळी झाली की दारूड्यांचा अड्डा भरतो. दारूच्या रिकाम्या बाटल्या तलावात फेकल्या जातात.