शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

१० तालुका कृषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा बडगा

By admin | Published: May 07, 2014 1:16 AM

अमरावती विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील १४ तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी चारच अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे

कार्यशाळेला दांडी मारल्याचे प्रकरण

जितेंद्र दखने

अमरावती विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील १४ तालुका कृषी अधिकार्‍यांपैकी चारच अधिकार्‍यांनी हजेरी लावल्यामुळे उर्वरित १० गैरहजर तालुका कृषी अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. कृषी विभागामार्फत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात रविवार ४ मे रोजी विभागीय खरीपपूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पाचही जिल्ह्यांतील सर्वच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तंत्रज्ञ मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आदींना विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला हजर राहण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. परंतु या कार्यशाळेमुळे रविवारच्या सुटीवर पाणी फेरल्याने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेकडे काहींनी पाठ फिरविली. विशेष म्हणजे या कार्यशाळेला विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. मात्र सभागृहातील तालुका कृषी अधिकार्‍यांची गैरहजेरी सातत्याने दिसून येत असल्याने या कार्यशाळेत कृषी सहसंचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अखेर याच ठिकाणी जिल्हानिहाय तालुका कृषी अधिकार्‍यांना उभे राहण्याचे फर्मान सोडत उपस्थितांची मोजणी केली असता यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी चार अधिकारी हजर होते. १० तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला जे अधिकारी गैरहजर होते त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे. रमेश भताणे कृषी अधीक्षक अधिकारी १० अधिकार्‍यांची कार्यशाळेला दांडी कृषी विभागामार्फत विभागीय खरीपपूर्व कार्यशाळा आयोजित केली होती. याबाबत विभागातील सर्वच तालुका कृषी अधिकार्‍यांना रितसर कळविल्यानंतरही जिल्ह्यातील अमरावती, तिवसा, भातकुली, चिखलदरा, वरूड, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार अशा दहा तालुका कृषी अधिकार्‍यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. चार अधिकार्‍यांनीच लावली हजेरी ४अकोला येथील कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, मोर्शी, धारणी आणि अंजनगाव सुर्जी अशा चारच तालुका कृषी अधिकार्‍यांनी हजेरी लावली होती.