लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तीन भागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील शासकीय परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. जलसंपदा विभागामार्फत प्रस्तावित योजनांमधून २६,३७० हेक्टर क्षेत्र १८८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे पुनर्स्थापित होणार आहे.चौराई धरणामुळे पेंच जलविद्युत प्रकल्प आणि तोतलाडोह या प्रकल्पात येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. या दुष्काळ निवारण कार्यक्रमाच्या भाग १ मध्ये वेस्टर्न कोलफिल्डसमधील खाणीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. वेकोलिच्या इंदर व कामठी खाणीतील १८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे २१६० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे. गोंडेगाव खाणीतून १० दलघमी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून १२०० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे.पेंच लाभ क्षेत्राातील प्रस्तावित सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४०१० हेक्टर क्षेत्रावरील वितरण प्रणालीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी ७ योजना भाग १ मध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मौदा येथील बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाºयावरून मौदा शाखा कालव्यात उपसाद्वारे सिंचनासाठी १८ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ चाचेर व बेलडोंगरीच्या खाली नवीन बंधारा बांधून २२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे. सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधून सी उपशाखा कालव्यात उपसाद्वारे १५ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे.सूर नदीवर भोसा-खमारी तसेच कोदामेंढी, इदोरा गावाजवळ नवीन बंधारा बांधून काटी जंक्शन कालव्यास उपसाद्वारे १९ दलघमी पाणी वापरता येणार आहे. कन्हान नदीवरील माथनी येथील जुन्या पुलास ब्रिज कम बंधारा करून तेथून पाणी उपसा सिंचन योजनाद्वारे मौदा शाखा कालव्यात सोडून सिंचनासाठी २६ दलघमी पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान नदीवरील पाणी पेंच उजव्या कालव्याच्या साक्रकिमी २२ वरील जलसेतू जवळ बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे ४० दलघमी पाणी सोडले जाणार आहे. सिहोरा येथे कन्हान नदीवर बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे २० दलघमी पाण्याचा वापर करता येणार आहे.भाग २ मध्ये भाग १ अंतर्गत ७ योजना, उपसा सिचन योजनेवर दाबयुक्त बंदिस्त पाईप वितरण प्रणालीद्वारे सिंचन व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. भाग ३ मध्ये पेंच प्रकल्पाअंतर्गत उजवा व डावा मुख्य कालव्याचे क्षतिग्रस्त अस्तरीकरण तसेच वितरण प्रणालीवरील बांधकामे दुरुस्ती करून कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.
१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:19 PM
मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ठळक मुद्देपेंच प्रकल्प लाभ क्षेत्राला लाभ : तीन टप्प्यात होणार कामे