नागपूर : महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरात सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहे. या शाळांमध्ये केजी १ व केजी २ वर्गामध्ये ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेतल्यास सुनिश्चित मानले जाईल. त्यानंतर प्रवेशासाठी अर्ज देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडत काढून प्रवेश दिला जाणार आहे.
दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शहरातील गरीब आणि गरजू परिवारातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहेत, असा विश्वास दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. शिक्षण सभापती दिलीप दिवे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके आदी उपस्थित होते.