नागपूर : शिक्षण क्षेत्रात ख्यातनाम असलेल्या दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूलच्या वर्धा रोडवरील डाेंगरगावस्थित शाखेतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता किंडरगार्टन ते इयत्ता बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण क्षेत्रामध्ये ४० वर्षांचा अनुभव आहे. दरवर्षी या शाळेतील सुमारे १००० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाकरिता विदेशामध्ये जातात. डोंगरगाव येथील शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई तर, इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण स्टेट बोर्ड मान्यताप्राप्त आहे. विद्यार्थ्यांना बुद्धिमान जागतिक नागरिक घडविण्यासाठी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी शाळेकडे सर्वोत्कृष्ट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट विभाग आहे. तसेच, ही शाळा राज्यातील सर्वोत्तम क्रीडा प्रशिक्षणाकरिता ओळखली जाते. शाळेच्या २४ एकर परिसरामध्ये जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, जिम्नॅस्टिक एरिया, बास्केटबॉल कोर्ट, इत्यादी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
देशात २०० पेक्षा अधिक दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल कार्यरत आहेत. कोट्यवधी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विक्रम या शाळेच्या नावावर आहे. शाळेने नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षणाची रचना केली आहे. अभ्यासक्रमात क्रीडा, कला व इतर शैक्षणिक उपक्रमांचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट ऑनलाईन शिक्षण पद्धती, टॅलेंट झोन आणि रोबोटिक्स व कोडिंगचे शिक्षण हे या शाळेचे मुख्य वैशिष्ट्य आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. तसेच, अधिक माहितीसाठी शाळेच्या डोंगरगाव व पांडे लेआऊट येथील कार्यालयांत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (वा.प्र.)