लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत, अशी माहिती थायरॉईड म्हणजेच गलग्रंथीच्या कर्करोगावर आधारित चर्चासत्रात तज्ज्ञांनी दिली.‘कॅन्सर रिलीफ सोसायटी’द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने दोन दिवसीय थायरॉईड कर्करोग व ‘एन्डोक्राईन’ कर्करोगावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसचिव रणधीर झवेरी, प्रसिद्ध ‘हेड अॅण्ड नेक’ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. मदन कापरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, मेडिकलच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक नितनवरे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. दासगुप्ता, सर्जन्स असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. राजेश सिंघानिया, हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा उपस्थित होते.चर्चासत्राची सुरुवात थायरॉईड कर्करोगावरील शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणाने झाली. डॉ. मदन कापरे व डॉ. अभिषेक वैद्य यांनी ही शस्त्रक्रिया करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. अंजली कोल्हे व डॉ. हेमलता शिर्के यांनी सहकार्य केले.डॉ. गिरीश मोघे, डॉ. कापरे, डॉ. वैद्य, डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. राज गजभिये, डॉ. सौरव विठाळकर, डॉ. प्रशांत ढोके, डॉ. सुधीर टोमे, डॉ. योगेश बंग, डॉ. राजेंद्र सावजी, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. शुभ्रजित दासगुप्ता, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. भाऊ राजूरकर व डॉ. मुकुंद ठाकूर यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या वैज्ञानिक सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक नितनवरे, डॉ. बी.एस. गेडाम, डॉ. आशुतोष गावंडे, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. राजेश सिंघवी, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. अंजली कोल्हे व डॉ. प्रदीप कटकवार होते.दोन दिवसीय चर्चासत्रात डॉ. सुशील लोहिया, डॉ. समीर ठाकरे, डॉ. डी. व्ही. डोईफोडे, डॉ. सरिता कोठारी, डॉ. हेमलता शिर्के, डॉ. प्रफुल्ल चहांदे, डॉ. अमोल हेडाऊ, डॉ. कर्तार सिंह, डॉ. यू. पी. पच्छेल उपस्थित होते. संचालन डॉ. मनीषा मिश्रा व डॉ. प्रियांका चौबे यांनी केले. आभार डॉ. बी. के. शर्मा यांनी मानले.
गलग्रंथीच्या कर्करोगात प्रौढ महिलांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:09 AM
गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत, अशी माहिती थायरॉईड म्हणजेच गलग्रंथीच्या कर्करोगावर आधारित चर्चासत्रात तज्ज्ञांनी दिली.
ठळक मुद्देथायरॉईड कर्करोग व ‘एन्डोक्राईन’ कर्करोगावर चर्चासत्र : राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल