अमरावतीत अपक्ष सरनाईक आघाडीवर
नागपूर/ अमरावती : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत भाजपला धक्का बसला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजप पिछाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीअंती चित्र होते.
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना पहिल्या पसंतीची २४ हजार ११४ मते प्राप्त झाली आहेत, तर भाजपचे संदीप जोशी यांना १६ हजार ८५२ मते मिळाली आहेत. वंजारी यांच्याकडे दुसऱ्या फेरीअखेर ७ हजार २६२ मतांची आघाडी होती. ५८ वर्षांपासून शाबुत असलेल्या बालेकिल्ल्यातच पिछाडीवर गेल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून काँग्रेसमध्ये उत्साह दिसून आला.
अमरावतीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ६,०८८ मते मिळवित आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावर महाआघाडीचे उमेदवार व मावळते आमदार श्रीकांत देशपांडे यांना ५,१२२ मते मिळाली. भाजपचे नितीन धांडे आश्चर्यकाररीत्या माघारले.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर रात्री उशिरा १४,९१६ मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी रात्री नऊनंतर मतमोजणीला सुरुवात होऊन सर्वात कमी १५ मते असणारे उमेदवार विनोद मेश्राम यांना प्रक्रियेतून बाद करण्यात आले. विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर
महाआघाडीचे देशपांडे यांच्याशी लढत, भाजप उमेदवार पिछाडीवर
अमरावती : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीअंती रात्री उशिरापर्यंत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ६,०८८ मते मिळवित आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावर महाआघाडीचे उमेदवार व मावळते आमदार श्रीकांत देशपांडे यांना ५,१२२ मते मिळाली. भाजपचे नितीन धांडे आश्चर्यकाररित्या माघारले.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर रात्री उशिरा १४,९१६ मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी रात्री नऊनंतर मतमोजणीला सुरुवात होऊन सर्वात कमी १५ मते असणारे उमेदवार विनोद मेश्राम यांना प्रक्रियेतून बाद करण्यात आले. विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या निवडणुकीत एकूण मतदान ३०,९१८ पैकी १०९८ मते अवैध ठरली. २९,८२९ मते वैध ठरली आहे. या निवडणुकीत एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. रात्री दोन नंतर निकाल जाहीर व्हायला किमान रात्रीचे २ तरी वाजतील, असे निवडणूक विभागाने सांगितले.