गुंतवणूक वाढविणार : गडकरींच्या उपस्थितीत टास्कफोर्सची बैठकनागपूर : मिहान प्रकल्पात गुंतवणूक वाढविण्यासाठी मुंबई व दिल्लीत गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करून प्रकल्पाचे मार्केटिंग करण्यावर पुढच्या काळात भर देण्याचा निर्णय गुरुवारी मिहान प्रकल्प सल्लागार समितीच्या (टास्क फोर्स) पहिल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने टास्कफोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्सची पहिली बैठक गुरुवारी रविभवनमध्ये झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत मिहानशी संबंधित भूसंपादन, पुनर्वसन, गुंतवणूक यासह विविध ३५ मुद्यांवर चर्चा झाली.६३ कंपन्यांशी चर्चा करणारमिहानमध्ये जागा घेऊनही काम सुरू न करणाऱ्या ६३ कंपन्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. त्यांच्या काय अडचणी आहेत, त्याबाबत त्यांचे म्हणणे ऐकून ‘टेबल टू टेबल’ चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येणार असून त्यांनी मिहानमध्ये काम सुरू करावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.रोजगार देणारप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्यासाठी मिहानमध्ये विशेष सेल सुरू करण्यात आला आहे. त्या माध्यमातून प्रकल्पबाधितांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.कामाचे वाटपराज्य शासनाच्या अखत्यारित असणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या प्रश्नाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आणि कंपन्यांच्या समस्यांसदर्भात तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.ऊर्जा प्रकल्पावर चर्चामिहानमधील अभिजित पॉवर प्रकल्पावर बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पाबाबत काही पर्याय तपासून पाहण्यात येत आहे. हा प्रकल्प महाजन्कोने घ्यावा, अभिजित ग्रुपने स्वत: हा प्रकल्प सुरू करून बाजारभावाप्रमाणे वीज द्यावी आदींचा त्यात समावेश आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. यासंदर्भात संबंधितांनी एकत्र बसून जनतेला परवडेल अशा दरात वीज उपलब्ध होईल का यादृष्टीने सरकारचे प्रयत्न आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.मिहानचे मार्केटिंगमिहानमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असताना त्याचे योग्य मार्केटिंग न झाल्याने नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. ते दूर करण्यासाठी प्रकल्पाच्या मार्केटिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी समितीचे सदस्य विलास काळे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली असून ते सर्वांशी चर्चा करतील. प्रथम मुंबईत एक कार्यशाळा होईल. त्यानंतर दिल्लीत मार्केटिंग करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वत: जपानसह विदेशातील आणि देशातील काही गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत.भूसंपादनाचा तिढा सोडवणारकेंद्र सरकारच्या अखत्यारित जमिनीचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांच्याशी खुद्द नितीन गडकरी चर्चा करणार असून यासंदर्भात लवकरच दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार आहे.कालबद्ध कार्यक्रममिहान प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम व्हावे यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासन, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, जिल्हा प्रशासन यांना काम करायचे असून दीड महिन्यानंतर होणाऱ्या बैठकीत झालेल्या कामाचा अहवाल सादर करायचा आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.टॅक्सी-वेटॅक्सी-वे साठी लागणाऱ्या ४० ते ४१ एकर जागेचा प्रश्न आहे. लोकांचा त्याला विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून पुढच्या काळात हा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.पुनर्वसनशिवणगावचे पुनर्वसन करण्यासाठी चिंचभवन येथे जागा उपलब्ध असून तेथे आठ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरुवात होईल. काहींना त्यांच्या मागणीनुसार घरे बांधून देण्यात येणार आहे. खापरीचे पुनर्वसन रेल्वे रुळाच्या अलीकडे करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या मुद्यांवर झाली चर्चाबैठकीत चर्चा झालेल्या प्रमुख विषयांमध्ये रोजगार व जमिनीचा वापर, प्रकल्पातील सोयी सुविधा, प्रकल्पाचे व्यवस्थापन, मिहानचे मार्केटिंग, पुनर्वसन, शिवणगावमधील जमिनीचे अधिग्रहण, खापरीतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, इसासनी, तेल्हारामधील जमीन हस्तांतरण, भारतीय वायुदलाच्या ताब्यातील २७८ हेक्टर व केंद्रीय पोलीस दलाच्या ताब्यातील २.३० हे.जमिनीचे हस्तांतरण, मिहान प्रकल्पातील विद्युत पुरवठा, झुडपी जंगल हस्तांतरण, चिंचभवन व खापरी येथील महामार्गावरील व्यावसायिकांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित जमीन.नकारात्मकता दूर करूमधल्या काळात काही अडचणी आल्याने प्रकल्पाच्या बाबत नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. पण आता मिहानमध्ये वीज, पाणी, रस्ते सर्वच आहे. त्यामुळे नकारात्मकता संपवून सकारात्मकताआणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातून या प्रकल्पाला पुन्हा टेक आॅफ मिळेल. चंद्रशेखर बावनकुळेपालकमंत्री, नागपूर
‘अॅडव्हान्टेज मिहान’ देणार भरारी
By admin | Published: April 17, 2015 2:11 AM