नागपूर : देशातील प्रत्येक सराफाकडे ग्राहकाला ३ टक्के जीएसटी चुकते करून सोने-चांदी खरेदी करावी लागते. २३ मे २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचे भाव ७३,२०० रुपये असले तरीही ग्राहकाला ३ टक्के जीएसटीसह ७५,३९६ रुपयांत सोने विकत घ्यावे लागले.वर्षभरात २३ मेपर्यंत सोन्याचे भाव जीएसटीविना १२,६०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केव्हाही परवडणारी आहे. शिवाय चांदीच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २३ मे रोजी प्रतिकिलो भाव ९१ हजार रुपयांवर पोहोचले. हेच भाव एसटीसह ९३,७३० रुपयांवर गेले आहेत. वर्षभरात प्रति किलो चांदीच्या भावात १८,८०० रुपयांची वाढ झाली.
वर्षभरात किती हजारांनी वाढले भाव? १ जून-२०२३ ६०,६००१ जुलै ५८,७००१ ऑगस्ट ६०,०००१ सप्टेंबर ५९,७००१ ऑक्टोबर ५७,८००१ नोव्हेंबर ६१,५००१ डिसेंबर ६३,०००१ जानेवारी-२०२४ ६३,७००१ फेब्रुवारी ६३,२००१ मार्च ६२,९००१ एप्रिल ६९,४००१ मे ७१,६००२३ मे ७३,२००(२४ कॅरेट सोन्याचे भाव, ३ टक्के जीएसटी वेगळा)का वाढले सोन्याचे भाव?जेव्हा मध्यवर्ती बँका राखीव म्हणून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात, तेव्हा चलनाचा पुरवठा वाढल्याने आणि सोन्याची उपलब्धता कमी असल्याने सोन्याच्या किमती वाढतात. चीन आणि भारतात दागिन्यांना मोठी मागणी आहे. औद्योगिक वापरातूनही सोन्याला मागणी वाढत आहे. शिवाय अनेक घटकांमुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८३.४० रुपये आहे. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचे हेदेखील एक कारण आहे.
व्यापारी काय म्हणतात ...
जगात सोने खरेदी वाढल्याने दरवाढआंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. वर्र्षभरात चीनने स्वत:कडील डॉलर्सने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. त्यासोबतच अन्य देशांनीही खरेदी वाढविली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा सोन्याचा साठा वाढवित आहे. अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताबदल होण्याची शक्यता आणि फेडरेल बँक ऑफ अमेरिकेने सप्टेंबरपर्यंत व्याजदर कमी करण्याचे संकेत दिल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय इस्त्राईलचे लगतच्या देशांसोबत सुरू असलेल्या युद्धात मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडले आहेत. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. तसेच भारतात वार्षिक ७०० ते ८०० टन असलेल्या सोन्याच्या मागणीत दरवर्षी वाढ होत आहे. मंदीचे संकेत नसल्यामुळे सोने-चांदीचे दर वाढतच राहतील. राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.