नागपुर- नागपूरातील मारबत ही प्रथा १४० वर्षे जुनी आहे. भोसले कालीन ही प्रथा आहे पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी साजरी केली जाते. मागील कोरोनाच्या २ वर्षे हे काढण्यात आली नव्हती. परंतु यंदा ती जल्लोषात होत असल्याने म्हणून आज लोकांमध्ये उत्साह दिसत आहे.
संपूर्ण नागपूरकर या मारबत व बडगे बघायला इतवारी परिसरात जमा होतात. या मारबत मध्ये दोन प्रकारच्या आहे. एक तर पिवळी मारबत हे मोठी असते तर काळी मारबत ही लहान मानल्या जाते. या मारबत सोबत बडगे ही काढले जातात जे राजकीय विषयावर भाष्य करणारे देखावे असतात.