आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे. ४ जानेवारीला ५५वी भारतीय बालरोग परिषदेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. परिषदेला १० हजारावर डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. जयंत उपाध्ये यांनी पत्रपरिषदेत दिली.या वेळी परिषदेचे मुख्य आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर, मुख्य आयोजन अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, डॉ. सुचित बागडे व डॉ अविनाश गावंडे उपस्थित होते.डॉ. उदय बोधनकर म्हणाले, २८ वर्षानंतर ही परिषद नागपूरला होत आहे. ही परिषद ‘हेल्दी न्यूबॉर्न-हॅपी टीन’ या संकल्पनेवर आधारित आहे. या परिषदेत देशातून बालरोगतज्ज्ञ सहभागी होतील. याशिवाय पाश्च्यात्त देशातून १७ विशेषज्ञ सहभागी होणार आहे. यामुळे चार दिवस चालणाºया परिषदेत बालरोग संदर्भातील नव्या संशोधनाची, अनुभवांची व कौशल्यांच्या माहितीचे आदानप्रदान होईल. डॉ. वसंत खळतकर म्हणाले, ४ ते ७ जानेवारी दरम्यान ही परिषद रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहासह परिसरातील आठ सभागृहात एकाचवेळी चालेल. डॉ. बागडे म्हणाले, या परिषदेत परिचारिकांसाठी कार्यशाळा, योग शिबिर आणि ‘वॉकथॉन’चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.पत्रपरिषदेला डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. महीब हक, डॉ. रिषी लोढया, डॉ. संजय मराठे, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ.कृतिश बालपांडे, डॉ.गिरीश चरडे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अनिल जयस्वाल, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. चेतन शेंडे व डॉ.प्रवीण डहाके उपस्थित होते.शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमीडॉ. वसंत खळतकर म्हणाले, सर्वात कमी बालमृत्यूंचे प्रमाण केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहे. ज्या राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला त्या राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम व आशा कार्यकर्ती या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यूची टक्केवारी आणखी कमी करणे शक्य आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील पॅरामेडिकल स्टाफ, एएनएम, आशा कार्यकर्तींना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
तब्बल २८ वर्षानंतर ‘पेडीकॉन’ परिषद नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:19 AM
भारतीय बालरोग अकादमीच्यावतीने बालरोग व नवजात शिशु रोगांमधील नवीन शोध, नव्या चिकित्सा पद्धतीची माहिती बालरोग तज्ज्ञापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पेडीकॉन’ परिषदेचे आयोजन करण्यात येते. नागपुरात १९९२ नंतर पुन्हा एकदा या परिषदेचे आयोजन करण्याचा मान बालरोग अकादमी नागपूरला मिळाला आहे.
ठळक मुद्दे५५वी भारतीय बालरोग परिषद गुरुवारपासून : बालरोग अकादमीचा पुढाकार