शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

३६ तासानंतरही सापडला नाही अदनान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:23 PM

चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची मोहीम केवळ खानापूर्ती : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.मंगळवारी सकाळी वनदेवीनगर येथे आठ वर्षाचा अदनान कुरैशी हा पिवळ्या नदीत वाहून गेला होता. अदनान मुलांसोबत खेळत होता. या दरम्यान पिवळ्या नदीत वाहून आलेला चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरून तो नदीत बुडाला. त्याला वाचवण्यासाठी कुणी पोहोचण्यापूर्वीच तो पाण्यासह वाहून गेला. तेव्हापासून अदनानचा शोघ घेण्यात येत आहे.अग्निशमन विभागाच्या दोन बोटीच्या मदतीने शोध घेतला जात आहे. कुटुंबीय आणि वस्तीतील नागरिकही त्याला शोधत आहेत. मंगळवरी दुपारी शोधमोहिम सुरु करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता अग्निशमन दलाच्या चमूने आपले हात वर केले आणि ते माघारी परतले. बुधवारी पुन्हा सकाळपासून शोधकार्य सुरू केले जाईल, असे सांगून ते गेले. ते गेल्यानंतरही कुटुंबीय आणि नागरिक मात्र शोध घेत होते.बुधवारी सकाळी नागरिक प्रशासनाची वाट पाहत होते. ईद असूनही वस्तीत मात्र शोक पसरला होता. नगरिकांनी सण साजरा करण्याऐवजी अदनानला शोधण्यास प्राधान्य दिले. त्यांनी मनपा व अग्निशमनचे अधिकारी आणि नेत्यांशी संपर्क साधून तातडीने शोधमोहिम सुरु करण्याची विनंती केली. दुपारी १ वाजता कळमना येथील अग्निशमन दलाची चमू मुलाला शोधण्यासाठी पोहोचली. भरतवाडा, विहिरगाव, पावनगाव परिसरात अदनानचा शोध घेण्यात आला. अग्निशमन दलाकडे केवळ एकच बोट होती. ती सुद्धा अधूनमधून बंद पडत होती. त्यामुळे मोटर बंद करून ती हातानेच चालवावी लागली. दुसऱ्या बोटीबद्दल विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी ५ वाजता ती चमूही रिकाम्या हातानेच परत गेली.नेते- अधिकाऱ्यांवर रोषस्थानिक प्रशासन व नेत्यांच्या वागणुकीने नागरिक अतिशय संतप्त आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, इतकी गंभीर घटना होऊनही वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी त्यांची कुठलही विचारपूस केली नाही. पिवळी नदीमध्ये यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. तरीही त्यापासून सुरक्षेची कुठलही उपाययोजना नाही. अदनानच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई, एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. आई मर्जिना मजुरी करते.अग्निशमन पथक थोडक्यात वाचलेमंगळवारी बचाव कार्यादरम्यान घटनास्थळ परिसरात अग्निशमन पथकातील जवान स्वत:च थोडक्यात वाचले. अग्निशमन पथक बोटीत स्वार होऊन शोध घेत होते. दरम्यान अचानक बोट पलटू लागली. काठावर नागरिक असल्याने त्यांनी दोर फेकून पथकाला वाचवले.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी