शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:31 PM

भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देमुकुल कानिटकर : नागपुरातील खासदार महोत्सवात ‘स्वामी विवेकांनद’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. खासदार महोत्सवात शुक्रवारी युवादिनी आयोजित ‘स्वामी विवेकांनद’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. कानिटकर पुढे म्हणाले, शिकागोच्या सर्वधर्म सभेत स्वामी विवेकानंदानी पहिल्यांदा बंधू-भगिनींनो म्हटले म्हणून त्यांचे भाषण गाजले असे सांगितले जाते. परंतु ते खोटे आहे. विवेकानंदाच्याही बºयाच आधी तीन व्यक्तींनी बंधू-भगिनींनो उच्चारले होते. शिकागोची ती सभा विवेकानंदांनी जिंकली याचे कारण वेगळे होते. ते जेव्हा दीड महिन्याचा सागरी प्रवास करून अमेरिकेत पोहोचले तेव्हा चोराने त्यांची बॅग पळवली. पुढचे अनेक दिवस त्यांनी संन्यासाच्या एका कपड्यावर अमेरिकेत भिक्षा मागत दिवस काढले. परंतु या देशात इतकी उपेक्षा सहन करूनही जेव्हा त्यांनी शिकागोच्या सभेत अमेरिकावासीयांना बंधू-भगिनींनो संबोधले तेव्हा तेथील लोकांना त्यांच्या मनाचा मोठेपणा कळला आणि पुढे अवघी अमेरिका त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेली. विवेकानंदांनी जगाला विज्ञानवाद दिला. त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याही अनेक गोष्टी ते तर्काच्या कसोटीवर पडताळल्याशिवाय स्वीकारत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा गुुरुंची परीक्षा घेतली. म्हणूनच आज १५० वर्षानंतरही समाज विवेकानंदांचे स्मरण करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्याख्यानाच्या प्रारंभी खा. अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, राजेश लोया, विजय सालंगकर, डॉ. उपेंद्र कोठेकर व कैलाश चुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक