शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM

मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.

ठळक मुद्देमुंबई-हावडा मेलमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.चिन्मय दास (७३) असे एका मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दास यांना कॅन्सर होता. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते पत्नी आणि जावयासह हावडाला जात होते. दुसरा मृत ४० वर्षे वयोगटातील आहे. दोघेही १२८०९ मुंबई-हावडा मेलच्या एस ३ कोचने प्रवास करीत होते. कोचमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मृत आजारी होता. सकाळी तो शौचालयाच्या दिशेने गेला. त्याला उलटी झाली आणि शौचालयाच्या गेटसमोरच तो पडला. इतर प्रवाशांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. इकडे प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती दास यांच्या कानावर पडली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर पोहोचले. पंचनामा करीत असताना दास यांची प्रकृती आणखीनच ढासळली. मृत प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. दास यांनाही खाली उतरविण्यात आले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार संजय पटले करीत आहेत.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू