शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

पाच वर्षे होऊनही १ नंबरला ग्राहक मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 8:46 PM

परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये चार लाख रुपयांचा ‘१’ या फॅन्सी नंबरला अद्यापही ग्राहक मिळालेला नाही. मोटारसायकलमध्ये केवळ दोन ग्राहकांनी ५० हजार रुपयांचा हा क्रमांक घेतला. फॅन्सी नंबरमधून मिळणारा महसूलही कमी झाल्याने परिवहन विभागाने पुन्हा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभाग : फॅन्सी नंबरची क्रेझ झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये चार लाख रुपयांचा ‘१’ या फॅन्सी नंबरला अद्यापही ग्राहक मिळालेला नाही. मोटारसायकलमध्ये केवळ दोन ग्राहकांनी ५० हजार रुपयांचा हा क्रमांक घेतला. फॅन्सी नंबरमधून मिळणारा महसूलही कमी झाल्याने परिवहन विभागाने पुन्हा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.व्हीआयपी स्टेटस् टिकविण्यासाठी फॅन्सी नंबरांसाठी अतिरिक्त पैसे मोजण्यास वाहनधारक पूर्वी नेहमीच तयार असायचे. अनेकदा फॅन्सी नंबरासाठी एकापेक्षा जास्त अर्ज यायचे. अशावेळी आरटीओ कार्यालय कचाट्यात सापडायचे. मध्यस्थी करून किंवा बोली लावण्याचे प्रकार व्हायचे. यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन विभागाने २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये ‘१’ नंबर हा चार लाख रुपयांचा तर इतर जिल्हांमध्ये याच नंबरला तीन लाख रुपये शुल्क लावण्यात आले. फॅन्सी नंबर महागल्यापासून वाहनधारक याकडे पाठ दाखवीत आहेत. काही वाहनधारक महागड्या फॅन्सी नंबराच्या भानगडीत न पडता, सामान्य नंबरांमधूनच चांगला नंबर मिळविण्यासाठी धडपडतानाचे चित्र आहे.१९ सिरीज बदलल्या, मात्र ग्राहकाचा पत्ता नाहीचारचाकी वाहनांमध्ये पूर्वी ‘१’ नंबर हा एक लाख रुपयात मिळायचा. वाहनाची नवीन सिरीज सुरू होताच अनेक वाहनधारक हा नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे. परंतु हा नंबर चार लाख रुपयांचा होताच व आतापर्यंत १९ सिरीज बदलल्या तरी ग्राहकाचा पत्ता नाही.दीड लाखाच्या नंबराप्रतिही उदासीनता९, ९९, ७८६, ९९९ आणि ९९९९ या नंबरांची किंमत पूर्वी ५० हजार रुपये होती, नंतर त्यात वाढ करून दीड लाख रुपये करण्यात आली. सध्या या शुल्कामध्ये सात फॅन्सी नंबर उपलब्ध असला तरी एकही नंबर गेलेला नाही. त्याखालोखाल ७० हजार व ५० हजार रुपयांमध्ये कमी आकर्षक नंबर असल्याने पाहिजे तो प्रतिसाद मिळन नसल्याचे चित्र आहे. मात्र, १५ हजाराच्या फॅन्सी नंबरांना बऱ्यापैकी ग्राहक मिळत आहेत.महसूलही घसरलापूर्वी फॅन्सी नंबरचे शुल्क कमी असल्याने साधारण सर्वच फॅन्सी नंबरला ग्राहक मिळायचे. दोन कोटींवर महसूल प्राप्त व्हायचा. परंतु २०१३ पासून शुल्कात तीनपट वाढ झाल्याने त्यातुलनेत महसूल वाढला नाही. उलट कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एक कोटी सहा लाख २१ हजार एवढाच महसूल मिळाला आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर