लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टार बस चालक-वाहकांमध्ये टिफीनच्या पैशावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात झाले. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.मंगेश हिरामण मेंढे (वय ३०) हा मूळचा सेलू (जि. वर्धा) जवळच्या मुंगरपूर येथील रहिवासी आहे. आरोपी रोशन गोडवे (वय २८) तसेच महेश गोडवे (वय ३०) हे दोघे सिंदी रेल्वे (जि. वर्धा) येथील रहिवासी आहेत. हे सर्व स्टार बसवर चालक-वाहक म्हणून काम करतात. आजूबाजूच्या गावातील रहिवासी असल्यामुळे त्यांच्यात ओळख आहे. त्यामुळे ते एकाच मेसमध्ये टिफीन घेतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात टिफीनच्या पैशावरून वाद झाला. या पार्श्वभूमीवर, मंगेश मेंढे त्याच्या खापरी पुनर्वसन वसाहतीतील भाड्याच्या खोलीत मित्रांसोबत रविवारी रात्री झोपायला गेला. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास आरोपी रोशन आणि महेश गोडवे त्यांच्या साथीदारांसह स्कॉर्पिओ (एमएच २६/व्ही ३७३५) कारने आले. त्यांनी मंगेश मेंढेला झोपेतून उठवून शिवीगाळ केली. त्याला बेदम मारहाण करीत आपल्या कारमध्ये कोंबले. काही अंतरावर त्याला पुन्हा मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून पळून गेले. मेंढेने या घटनेची तक्रार बेलतरोडी ठाण्यात नोंदवली. एएसआय सय्यद मुश्ताक यांनी मेंढेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात अपहरण करून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:02 AM
स्टार बस चालक-वाहकांमध्ये टिफीनच्या पैशावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात झाले. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ठळक मुद्देचालक-वाहकांमधील वाद : टिफीनच्या पैशाचे कारण