शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का; दिग्गज नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
2
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
3
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
5
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
6
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
7
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
8
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
9
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान
10
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
11
पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचा कर्जत जामखेडमध्ये मराठीतून संवाद
12
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
13
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
14
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
15
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
16
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
17
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
18
महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...
19
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."

सेवानिवृत्तीनंतर जि.प. शिक्षकांना निवड श्रेणी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:08 AM

आता काय उपयोग : शिक्षकांचा सवाल कुही : जिल्हा परिषद सेवेत नोव्हेंबर १९६७ पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागलेल्या ...

आता काय उपयोग : शिक्षकांचा सवाल

कुही : जिल्हा परिषद सेवेत नोव्हेंबर १९६७ पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागलेल्या शिक्षकांना २४ वर्षे सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर चटोपाध्याय आयोगानुसार अनुज्ञेय असणाऱ्या निवड श्रेणीचा लाभ १९९१-९२ मध्ये मिळायला हवा होता; परंतु याकडे जि.प. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर ६५२ शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.

यादीमधील बहुतांश शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. १९८६ पूर्वी पदोन्नती, मृत्यू व सेवानिवृत्त झालेले १३८ शिक्षक अपात्र ठरले असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जि.प. प्रशासनाची अशीच गती राहिल्यास सध्या कार्यरत व २४ वर्षे सेवा कालावधी पूर्ण झालेल्या हजारो शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ सेवानिवृत्तीपूर्वी मिळणार का, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केला आहे.

पात्र शिक्षकांना सेवेत कार्यरत असताना निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी जि.प. प्रशासनाने एखादे संगणकीय सॉफ्टवेअर तयार करावे, अशी मागणी महेश जोशी, शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, नितीन किटे, देवीदास काळाने, नारायण पेठे, नंदकिशोर उजवणे, मोरेश्वर तडसे, दीपचंद पेनकांडे, रमेश बिरणवार, श्यामराव डोये, शरद मासूरकर, नरेश धकाते, अशोक डहाके, वामन सोमकुवर, भावना काळाने, रूपचंद फोपसे, तुकाराम ठोंबरे, प्रवीण मेश्राम, ललिता रेवतकर, चंद्रकांत मासूरकर, भास्कर उराडे, सुनील नासरे, प्रदीप दुरगकर, अरविंद आसरे आदींनी केली आहे.