शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

पतीच्या मृत्यूनंतर 'ती' बनली कुली! कंबरेला पदर खोचत १७ वर्ष कष्ट; 'नारी शक्ती'ची यशस्वी कहाणी 

By नरेश डोंगरे | Published: October 15, 2023 6:31 PM

तीन लहान मुले आणि पहाडासारखे खडतर आयुष्य समोर आ वासून उभे होते. मात्र ती डगमगली नाही.

नागपूर : तीन लहान मुले आणि पहाडासारखे खडतर आयुष्य समोर आ वासून उभे होते. मात्र ती डगमगली नाही. तिने कंबरेला पदर खोचला अन् दंडाला बिल्ला बांधून उभी झाली रेल्वे स्टेशनवर. शेकडो जणांच्या गर्दीत ती एकटीच होती. मात्र, तिने स्वत:ला हरवू दिले नाही. स्वाभिमान अन् कष्टाच्या भरवशावर मुलांचा सांभाळ केला अन् पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुली म्हणून काम करत रेल्वेस्थानकावर भक्कम पाय रोवले.

विशाखा धर्मपाल डबले असे तिचे नाव. विशाखाचे पती धर्मपाल रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करायचे. गरीबी असली तरी संसार सुखाचा होता. मात्र, पती नेहमीसाठीच निघून गेला. पोरकी झालेल्या विशाखा आणि तिच्या मुलांना सासू-सासरे आणि नातेवाईकांनी काही दिवस साथ दिली. विशाखाचे शिक्षण जेमतेम नवव्या वर्गापर्यंतच झालेले. त्यामुळे नोकरी मिळण्याचीही आशा नव्हती. सासर, माहेर दोन्हीकडे गरिबीच. त्यात आजुबाजुच्यांकडून मिळणारे वेगवेगळे सल्ले विशाखाला आणखीनच सैरभैर करीत होते. मात्र, तिने धिरोदत्तपणे वेळेशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. 

घरच्या खुंटीला टांगलेला पतीचा बिल्ला दंडाला बांधला, कंबरेला पदर खोचला अन् रेल्वे स्टेशनवर उभी झाली. विशाखाच्या पतीसोबत 'कुलीगिरी' करणाऱ्यांनी विशाखाला साथ दिली अन् तिला 'कुली नंबर ६०' म्हणून मान्यता मिळाली. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांचे अवजड सामान डोक्यावर घेऊन विशाखाने कष्टाची रोजीरोटी मिळवली. मुलांचे शिक्षण अन् पालनपोषण करीत त्यांना मोठे केले. आज कुली म्हणून तिच्या कामाला १७ वर्षे झाली. या कालावधीत तिने कष्टाची भक्ती अर्थात शक्तीची उपासना करत स्वत:ला सिद्ध केले. तसे पाहता कुली म्हटले की अमिताभ बच्चनची आठवण येते. विशाखाही नागपूर रेल्वे स्टेशनवर कुलीगिरी करताना लेडी अमिताभ बनली. 

टॅग्स :nagpurनागपूरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी