फेरबदलानंतर ‘ते’ नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
By कमलेश वानखेडे | Published: October 7, 2023 03:13 PM2023-10-07T15:13:26+5:302023-10-07T15:14:44+5:30
वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळेबाजांचे सरकार
नागपूर : गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्यांना शुद्ध करून, गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. पण ‘डाग जरा जिद्दी है’ अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झालेली आहे. त्यांची नावे मी आता जाहीर करून शकत नाही. मात्र, मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतर हे नऊ मंत्री मंत्रीमंडळात नसतील, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये या भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावेच लागेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळे बाजांचे सरकार आहे. हे मंत्री पूर्णतः लुटमार करणारे आहेत. यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे यांना पंधरा दिवसांच्या आत काढावेच लागेल. नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनतेसमोर मांडल्या शिवाय राहणार नाही. या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत. तर भाजपनेच आरोप लावलेले आहेत. त्यांच्या नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेत किंवा चौकशी किंवा ईडी ने नोटीस बजावलेल्या आहेत.
हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलेसे आहे आणि त्याचा निरक्षणातून हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना एक मिनिट सुद्धा पदावर ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली. इंडियाच्या जागा वाटपाचे सूत्र दिल्लीतच ठरत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागवार पदाधिकांच्या बैठका घेणं सुरू केले आहे. १२ तारखेला त्याची बैठक नागपूर मध्ये होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
१६ आमदारांवर कारवाई होणारच
त्या आमदारांवरती कारवाई होणारच आहे. फक्त आजचं मरण उद्या वरती चालढकल चालली आहे. कायद्यातून कोणी वाचवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार नेहमीच नाराज असतात
- अजित पवार नेहमीच नाराज असतात. ही त्यांची ‘टॅक्टिस’ आहे. नेहमी नाराज असल्याचे दाखवणे आणि आपले वर्चस्व कायम करणे, हे त्यांचे कौशल्य आहे. ते आमच्या मंत्रिमंडळातही होते. तेव्हाही त्यांनी तेच केले. कधी नॉट रिचेबल, कधी स्विच ऑफ , तर कधी त्यांना ताप आलाय. हे सगळी राजकीय बिमारी असल्याचा चिमटा वडेट्टीवारांनी काढला