शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

गोव्यातील यशानंतर नागपूरात जंगी स्वागत; फडणवीसांनी गडकरींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 3:55 PM

भाजपच्या गोव्यातील विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. गोव्याच्या निवडणुकांची जबाबदारी भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमतदेखील मिळालं. भाजपच्या विजयानंतर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विजयी रॅलीदरम्यान फडणवीसांनी गडकरींच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी गडकरींशी संवाद साधत पाया पडून आशीर्वादही घेतले.

गोव्यातील अभूतपूर्व यशाबद्दल नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी मोठी रॅलीही काढण्यात आली होती. ही रॅली गडकरींच्या निवासस्थानाजवळ पोहोचली तेव्हा नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी फडणवीस यांचं औक्षण केलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले. 

महाराष्ट्रातही भगवा फडकवण्याचा निर्धारकाँग्रेस आणि इतर पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची लढाई नोटाशी होती. नोटाला देखील त्यांच्यापेक्षा चांगली मते मिळाली, असा खोचक टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. "हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे. आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. पण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा सर्वच त्यांच्या हातातून गेलं. त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' फक्त राहिले," असा टोला फडणवीसांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीGoa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२