लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विना आंदोलन, विद्यावेतन मिळणार नाही, असे काहीसे चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) निर्माण झाले आहे. दरवर्षी थकीत विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांना आंदोलन करावे लागते. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात आंदोलन झाले. आता पुन्हा मार्च महिन्यापासून विद्यावेतन रखडल्याने संतापाचे वातावरण आहे. अधिष्ठात्यांनी १० एप्रिलपर्यंत विद्यावेतन देण्याची ग्वाही दिली आहे. या तारखेनंतर विद्यावेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.नागपूर मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचे जून तेऑगस्ट २०१८ या तीन महिन्यांचे विद्यावेतन रखडले होते. निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा देताच मेडिकल प्रशासनाने स्थानिक स्तरावर स्वत:च्या खात्यातून निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन अदा केले. मात्र यावर कोषागार विभागाने आक्षेप नोंदविला. यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्याचे पुन्हा विद्यावेतन थांबले. याकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांनी काळी रिबीन बांधून, ‘थाळी बजाओ’ आणि ‘कॅण्डल मार्च’ काढून लक्ष वेधले. त्यानंतर शासनाने निवासी डॉक्टरांच्या खात्यात विद्यावेतन जमा केली. आता पुन्हा मार्च २०१९ पासून विद्यावेतन थकले आहे. याबाबत निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांची भेट घेतली. त्यांनी १० एप्रिलपर्यंत विद्यावेतन खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले. यामुळे ‘मार्ड’ने तुर्तासतरी आंदोलनाची भूमिका पुढे ढकलली आहे.२ कोटी ७९ लाख विद्यावेतनमेडिकलमध्ये ६०० निवासी डॉक्टर आहेत. दर महिन्याला यांच्या विद्यावेतनावर २ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च येतो. रुग्णालयाचा कणा असलेल्या निवासी डॉक्टरांच्या या विद्यावेतनाबाबत शासन मात्र गंभीर नाही. यामुळे वारंवार रखडत असल्याचा आरोपही ‘मार्ड’ने केला आहे.११ एप्रिलपासून आंदोलनविद्यावेतनाला घेऊन मुंबईत मार्डचे पदाधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना भेटले. त्यांनी नागपूर मेडिकलचे विद्यावेतन जून २०१९ पर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली. मेडिकलचे अधिष्ठाता यांनी १० एप्रिलपर्यंत विद्यावेतन देण्याची तयारी दर्शवली. यामुळे आम्ही १० एप्रिलपर्यंत थांबून ११ एप्रिलपासून आंदोलन हाती घेणार आहोत.-डॉ. आशुतोष जाधवअध्यक्ष, मार्ड मेडिकल
पुन्हा रखडले विद्यावेतन : निवासी डॉक्टरांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:20 AM
विना आंदोलन, विद्यावेतन मिळणार नाही, असे काहीसे चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) निर्माण झाले आहे. दरवर्षी थकीत विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांना आंदोलन करावे लागते. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात आंदोलन झाले. आता पुन्हा मार्च महिन्यापासून विद्यावेतन रखडल्याने संतापाचे वातावरण आहे. अधिष्ठात्यांनी १० एप्रिलपर्यंत विद्यावेतन देण्याची ग्वाही दिली आहे. या तारखेनंतर विद्यावेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
ठळक मुद्देनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय