शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केंद्र सरकारविरुद्ध ‘भामसं’ रस्त्यावर

By admin | Published: July 08, 2016 2:56 AM

केंद्र सरकारची धोरणे कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत या धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरला आहे.

कामगार विरोधी धोरणांचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर : केंद्र सरकारची धोरणे कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत या धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरला आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणीचे निवेदन सुद्धा सादर करण्यात आले. मागील फेब्रुवारीमध्ये हैदराबाद येथे भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत कामगार कायद्यातील सुधारणांच्या विरोधात एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण सुरूच ठेवले. त्यामुळे या धोरणाचा निषेध म्हणून भारतीय मजदूर संघाचे विदर्भ अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार कायद्यात ज्या सुधारणा केल्या जात आहेत, त्या कामगारांच्या विरोधात असून त्या तातडीने बंद करण्यात याव्यात, कामगार संघटनांना दिलेली आश्वासने तातडीने पाळण्यात यावीत, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचाही तीव्र विरोध करण्यात आला. आंदोलनात गजानन गटलेवार, श्रीराम बाटवे, वसंतराव पिंपळापुरे, शंकरराव पहाडे, गणेश गुल्हाने, माधव लोहे, सुहास तिवारी, विनोद व्यवहारे, उमेश गोडे, शैलजा गणवीर, विवेक दंडारे, मीनल बाविस्कर आदींचा समावेश होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात आज, ८ जुलै रोजी देशभरातील प्रमुख जिल्ह्याच्या ठिकाणी आणि औद्योगिक केंद्रासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)