वसीम कुरैशी
नागपूर : बुटीबाेरीमध्ये नवनिर्मित उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर या शहराला दत्तक घेणे व आदर्श नगरपरिषद बनविण्याच्या घाेषणेच्या केवळ १२ दिवसांतच विकासाची रूपरेखा तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. आराखडा तयार करण्यासाठी पुण्याच्या एका एजन्सीला जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. ही एजन्सी २५ लाेकांच्या टीमसह तीन महिन्यांत आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करील, असे सांगण्यात येत आहे.
वर्धा राेडवरील ब्लॅकस्पाॅट मानल्या जाणाऱ्या बुटीबाेरी चाैकात निर्मित उड्डाणपुलाचे १७ जूनला लाेकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुटीबाेरी नगरपरिषदेला दत्तक घेण्याची घाेषणा केली. त्यामुळे बुटीबाेरी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला व वेगाने काम सुरू झाले. या कार्यक्रमातच नागपूर ते बुटीबाेरी राेड सहापदरी करणे व मेट्राेचा बुटीबाेरीपर्यंत विस्तार करण्याच्या घाेषणेने उत्साह निर्माण झाला.
१२०० हेक्टरचा डीपी प्लॅन
बुटीबाेरी नगरपरिषदेत १२०० हेक्टरचा डीपी प्लॅन तयार हाेईल. सध्या ही नगरपरिषद चार गावांत मर्यादित आहे. शहराच्या चारीही दिशांमध्ये तीन कि.मी.पर्यंत मर्यादा वाढविण्यासाठी लवकरच नगर परिषदेत प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्यात येईल. याअंतर्गत एमआयडीसीचा अर्धा भाग, हिंगणा, आदी परिसरांचा भाग बुटीबाेरी नगरपरिषदेत समाविष्ट हाेईल.
आराखड्यातील बिंदू
- अंतर्गत रस्त्यांचा विकास. इनडाेअर स्टेडियम, स्विमिंग पूल, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक लाइन, सिवरेज लाईनची निर्मिती.
- वेणा नदीकाठावर १५० दुकाने असलेली चाैपाटी. यामुळे ७०० लाेकांना राेजगार मिळण्याचा अंदाज.
- ५०० दुकानांचे शाॅपिंग काॅम्प्लेक्स : शक्यताे हा राज्यातील सर्वांत माेठा शाॅपिंग काॅम्प्लेक्स असेल. यात २५०० लाेकांना राेजगार मिळेल.
ईकाे फ्रेंडली विकासावर भर
१५व्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून आधी बुटीबाेरी विकासासाठी पाच काेटी मिळत हाेते, ज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाची भागीदारी हाेती. मात्र महापालिकेला समाविष्ट केल्याने नगर परिषदेला केवळ एक काेटी मिळतात. त्यामुळे हिरवळीचे काम प्रभावित झाले आहे. यासाेबत पथदिवे, कार्यालयांमध्ये साैरऊर्जा उपयाेगावर भर आहे. बुटीबाेरीत पंचतारांकित हाॅटेल व्हावे. एमआयडीसीमध्ये ३५० कंपन्या आहेत. यामध्ये आणखी वाढ व्हावी. बारामतीप्रमाणे आयटी सेक्टर व्हावा. विकास हिरवळीसह व्हावा.
बबलू गाैतम, अध्यक्ष, बुटीबाेरी, नगर परिषद
ईएसआईसी हाॅस्पिटल निर्मितीस उशीर
बुटीबाेरीत ईएसआयसी रुग्णालय निर्मितीसाठी सर्व कागदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र संबंधित समितीच्या वेळकाढू कार्यप्रणालीमुळे कामाला सुरुवात झाली नाही. आधी १७ किलोमीटर दूर प्रस्तावित रुग्णालय आता तीन किलोमीटरपर्यंत आणले. या रुग्णालयाने बुटीबाेरी व हिंगणा एमआयडीसीतील एक लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळू शकताे. बुटीबाेरीत माेठे शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे या ३०० बेडच्या प्रस्तावित रुग्णालयाचे काम लवकर सुरू व्हावे, अशी भावना बबलू गाैतम यांनी व्यक्त केली.