लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रोजगाराच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही बेरोजगार तरुणांनी केंद्र व राज्य सरकारचा विरोध करत पदव्यांच्या प्रतिलिपी जाळल्या.‘रायुका’चे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी तसेच ग्रामीण अध्यक्ष श्याम मंडपे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात नारेबाजी केली. पंतप्रधानांनी दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्यांनी पकोडे विकण्याचा सल्ला दिला होता. यासाठीच तरुणांनी शिक्षण घेतले होते का, असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला. यावेळी ईश्वर बाळबुधे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, धनराज फुसे, अर्चना हरड़े, दिलीप पनकुले, ज्वाला धोटे, जावेद हबीब, चरणजित चौधरी, जानबा मस्के, नूतन रेवतकर, राजू नागुलवार, प्रवीण पाटील, अमोल पारपल्लीवार, महेंद्र भांगे, रमेश फुले, रिजवान अन्सारी, वर्षा शामकुळे, राकेश बोरीकर, मिलिंद मानापुरे, शैलेश पांडे, देवीदास गोड़े, योगेश कुंभलकर, सुरेश करणे, अशोक काटले, उर्वशी गिरडकर, वाजिद शेख, अमित दुबे, दिनकर वानखड़े, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, रवि पराते, आकाश गजबे, रुद्र धाकडे, अनिल बोकडे, अमित पिचकाते, तौसिफ शेख, सुफी टायगर, नागेश देधमुठे, अजहर पटेल, रोहन सिंह, राजेश मासुरकर, विश्वास पक्खिदे, सैयद शहबाज, समीर शेख, आकाश कटारे, अश्विन पक्खिदे, नीरज तवानी, जय दुबे, सौरभ दुबे, विलास मालके, मनीष मोरे, लोकेश बोबडे, पूनम रेवतकर, बलजीत सिंह ढिल्लन, धर्मपाल वानखड़े, आकाश चिमनकर इत्यादी उपस्थित होते.
सरकारविरोधात ‘रायुका’चा आक्रमक पवित्रा : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:29 AM
रोजगाराच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही बेरोजगार तरुणांनी केंद्र व राज्य सरकारचा विरोध करत पदव्यांच्या प्रतिलिपी जाळल्या.
ठळक मुद्देतरुणांनी जाळल्या पदवीच्या प्रती