नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियमच्या आतमधील परिसर मंगळवारी नवीन संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या घाेषणांनी दुमदुमला. ‘बाेल मेरी बहेना हल्ला बाेल, बाेल मेरे भैया हल्ला बाेल,’ अशा घाेषणांसह सरकार, व्यवस्थेच्या विराेधात आपला आक्राेश व्यक्त करीत या संघटना मागण्यांकडे लक्ष वेधत हाेत्या.
अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना
मानधनवाढ, पेन्शन लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या शेकडाे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांनी धरणे मंडपात मंगळवारी आंदाेलन केले. दरम्यान, दुपारी संघटनेच्या शिष्टमंडळाशी संबंधित मंत्र्यांची भेट झाल्यानंतर आंदाेलन थांबविण्यात आले.
पदाधिकारी : संजय मापले, चंदा नवले-सचिव, रेखा गुंबळे, शालिनी देशमुख, विमल बाेरकुटे, वंदना धाकडे, माधुरी देशमुख, करुणा तायडे, वंदना शेलाेकर, सुभाष इंगासपुरे, आदी.
मागण्या : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कामासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणे.
- अंगणवाडी सेविकांचे मानधन १८००० रुपये तर मदतनीसांचे मानधन १५००० रुपये करणे.
- अंगणवाडी : मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या रिक्त जागा तातडीने भरणे.
- सेवासमाप्तीनंतर सेविकांना ५ लाख व मदतनिसांना ३ लाख रुपये लाभ देण्यात यावा.
- एक महिन्याची भरपगारी सुटी व आजारपणाची रजा लागू करणे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ
जुनी पेन्शन याेजना व विनाअनुदानित शाळांना अनुदान लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे धरणे आंदाेलन करण्यात आले.
कार्यकारिणी : अध्यक्ष- व्ही. यू. डायगव्हाणे, महासचिव - व्ही. जी. पवार, काेषाध्यक्ष - भारत घुले, सुधाकर अडबाले, आदी.
मागण्या : नाेव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळा : तुकडीवर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू करणे.
- नाेव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू करणे.
- विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान लागू करणे.
- राज्यातील अघाेषित शाळा, नैसर्गिक वाढीव तुकड्यांना अनुदानास पात्र घाेषित करून निधीची तरतूद करणे.
- माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे.
खासगी शाळा शिक्षक संघ
शिक्षण विभागातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असून शिक्षकांनी त्याविरुद्ध रस्त्यांवर उतरून निषेध नोंदविला. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविराेधात कारवाईची मागणी करीत धरणे आंदाेलन करण्यात आले.
पदाधिकारी : रमोद रेवतकर, विजय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, लोकपाल चापले, पुरुषोत्तम टोंगे, मोरेश्वर मौदेकर, संदीप सोनकुसरे, रवींद्र जेनेकर, आदी.
मागण्या : अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांना न्याय देणे.
- कोरोना योद्ध्यांना सानुग्रह अनुदान ५० लक्ष.
- वरिष्ठ श्रेणी मान्यता प्रकरणात शिक्षणाधिकारी यांचा अवास्तव हस्तक्षेप व गोंधळ दूर करणे.
- वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरणाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.
- पेन्शन प्रकरणे यादी पटलावर प्रसिद्ध करणे.