लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने संविधान चौकात आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष रूपा कुळकर्णी, सचिव विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या निदर्शनानंतर निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात डॉ. रूपा कुळकर्णी, विलास भोंगाडे, कांता मदामे ,सुरेखा डोंगरे, ममता पाल आदी उपस्थित होत्या. संघटनेने आपल्या निवेदनात महाराष्ट्र घरेलू कामगार कायदा २००८ मध्ये सुधारणा करण्यात यावी, किमान वेतन गठित करण्यात यावे, बोनस व पेन्शन देण्यात यावे, रविवारची सुटी देण्यात यावी, घरेलू कामगार कल्याणकारी बोर्डाची स्थापना करावी, दहा हजार रुपये सन्मानधन त्वरित मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात शुभांगी शेंडे, कविता चव्हाण, मंजुळा मेश्राम, चंदा आंभोरे, सुजाता भोंगाडे, शिला बोरकर, लीलाबाई उईके, रोशनी गंभीर, राजश्री मेश्राम, आरती बोरकर, प्रतिमा गोडघाटे, सरिता जुनघरे, अश्विनी भारद्वाज, दुर्गा मुंजेवार, वंदना फुले, छाया सोमकुवर आदी सहभागी झाल्या होत्या.
नागपुरात घरकामगार महिलांनी केले हक्कासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:25 PM