नागपूर : विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शुक्रवारी रात्री १२ वाजतापासून अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला शिस्तबद्ध सुरुवात झाली. बुलडाणा वगळता विदभार्तील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील ७८० उमेदवारांची चाचणी झाली.
देशातील दुसऱ्या वषार्तील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. यावर्षी ६ हजार ३५३ उमेदवारांची चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे.
सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॉरिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली.
शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पधेर्नंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.