लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांसाठी ‘युपीएल’ उद्योग समूहाने शेतीविषयक सेवासाठी ‘युनिमार्ट’ सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांची प्रती एकर मिळकत वाढविण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी या सेवाकार्याची चांगली मदत होत आहे. शुक्रवारी ‘युपीएल’ स्टॉलचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या सेवाकार्याचे कौतुक केले.या सेवेच्या अंतर्गत विशेषज्ञाचा सल्ला, माती परीक्षण व वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यासोबतच विशेषज्ञाची शेतावर भेट, भाज्यांची चालू दराची माहिती दिली जात आहे. शिवाय, फोनवर विशेषज्ञाचा सल्ला, हवामानासंबधी माहिती व शेतीविषयक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाते. ‘स्टॉल’ वर युपीएल’ उद्योग समूहाचे भाजीपाल बियाणे, तणनाशके, जल संरक्षण व भू-सुधारके, तृणधान्य बियाणे, खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्य, बुरशीनाशक व चारा बियाणे आदी उत्पादने उपलब्ध करून दिली आहे. या स्टॉलवर शेतकरी बांधवाची गर्दी होत असून विविध माहिती पत्रकाद्वारे त्यांना माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. ‘स्टॉल’वर आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर अनेकांनी ‘युनिमार्ट’मधून विविध पिकांसाठी झेबा तंत्रज्ञानासह योग्य सल्ला मिळतो, अशी माहिती दिली.डेक्को तंत्रज्ञानाचे जाणून घेतले फायदे‘युपीएल’च्या ‘स्टॉल’वरून शेतकऱ्यांनी ‘डेक्को’ तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेतले. यात संत्र्यासारखी फळे घट्ट आणि ताजी कशी राहतात, फळे आणि भाज्या जास्त काळ कशी टिकतात. फळे जास्त आकर्षक दिसण्यासाठी कशी मदत होते आणि या सर्वांचा फायदा किमत मिळण्यासाठी कसा होतो यावर उपस्थित तज्ज्ञानी मार्गदर्शन केले. सोबतच ‘झेबा’ कशाप्रकारे काम करते याची माहितीही शेतकऱ्यांनी जाणून घेतली.
‘युनिमार्ट’मधून कृषी सल्ला व समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:38 AM
शेतकऱ्यांसाठी ‘युपीएल’ उद्योग समूहाने शेतीविषयक सेवासाठी ‘युनिमार्ट’ सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांची प्रती एकर मिळकत वाढविण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी या सेवाकार्याची चांगली मदत होत आहे. शुक्रवारी ‘युपीएल’ स्टॉलचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या सेवाकार्याचे कौतुक केले.
ठळक मुद्दे‘युपीएल’ उद्योग समूहाच्या स्टॉलवरुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन