जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाचे दिवस व निरंक दिवस.
जिल्हा - पावसाचे दिवस - निरंक दिवस
बुलडाणा - ३८ - ५४
अकोला - ३८ - ५४
वाशिम - ४९ - ४३
अमरावती - ४४ - ४८
यवतमाळ - ५३ - ४०
औरंगाबाद - ४१ - ५१
जालना - ४४ - ४८
बीड - ४६ - ४६
लातूर - ५० - ४२
उस्मानाबाद - ३९ - ५३
नांदेड - ४६ - ४६
परभणी - ४१ - ५१
हिंगोली - ४१ - ५१
ठाणे - ७२ - २०
रायगड - ८२ - १०
रत्नागिरी - ८९ - ३
सिंधुदूर्ग - ८८ - ४
पालघर - ७२ - २०
वर्धा - ४७ - ४५
नागपूर - ४९ - ४३
भंडारा - ५१ - ४१
गोंदीया - ५५ - ३७
चंद्रपूर - ५७ - ३५
गडचिरोली - ६३ - २९
नाशिक - ४९ - ४३
धुळे - २९ - ६३
नंदूरबार - २६ - ६६
जालना - २६ - ६६
अहमदनगर - ३४ - ५८
पुणे - ४९ - ४३
सोलापूर - ३७ - ५५
सातारा - ५२ - ४०
सांगली - ४६ - ४६
कोल्हापूर - ६१ - ३१
एकूण - ७२ - २०
.............................
परतीचा पाऊस असेल जोमाचा
पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची तारीख साधारणत: २२ सप्टेंबर मानली जाते. राज्यात यंदा परतीचा पाऊस जोमाचा असेल, असा अंदाज आहे. आतापर्यंतची कमी टक्केवारी या काळात पूर्ण होईल, असे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. अंदाज, बंगालच्या उपसागरात या काळात कमीदाबाचे पट्टे तयार होती. त्यामुळे पाऊस चांगला पडेल, असा अंदाज आहे.
.....................
पावसाने ओढ देण्याची कारणे
यंदा मान्सून विलंबाने आला. मौसमी वाऱ्यांची दिशा वारंवार बदलत राहिली. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्याने हा परिणाम झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड नेगेटिव्ह असला की पाऊस कमी असतो. समुद्राकडून येणारे मौसमी वारे यंदा अधिक अनुकूल नाहीत.
........................