लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाच्या असमतोलाने या वर्षात संपूर्ण गणितच बिघडवून टाकले आहे. सप्टेंबर उजाडला, तरी अनेक जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठलेली नाही. अनेक धरणांची पातळी अर्ध्यावरही नाही. मध्यम आणि निम्न प्रकल्पांमधील पाणीसाठा ४५ टक्क्यांवरही नाही. लघू प्रकल्पात जेमतेम १८ टक्केच पाणी साठले आहे. राज्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. मात्र, मोसमी वाऱ्यांनी दगा दिला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे अपेक्षेपेक्षा कमी निर्माण झाल्याने राज्यातील पर्जन्यमानावर परिणाम झाला. बदललेल्या हवामानाने मनुष्याच्या प्रकृतीवर परिणाम जाणवत आहे. सगळ्यात जास्त फटका शेतीला बसणार असून, येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, अशीच एकंदर स्थिती आहे. आता सर्व आशा परतीचा पावसावर आहे. तो चांगला पडल्यास या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.
राज्यात आतापर्यंत कोकण व गोव्यात १२ टक्के, मध्य महाराष्ट्र ९ टक्के, मराठवाड्यात १९ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विदर्भात मात्र १४ टक्के पाऊस कमीच आहे.
..............................
मान्सून राज्यात दाखल झाल्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत झालेला एकूण पाऊस (जून, जुलै, ऑगस्ट).
जिल्हा - झालेला पाऊस - टक्केवारी
अमरावती विभाग
बुलडाणा - ५०९.६ - ९४.६
अकोला - ३३२.८ - ९२.६
वाशिम - ६९५.२ - १०७.६
अमरावती - ५५६.५ - ७८.५
यवतमाळ - ७७८.६ - ११५.५
अमरावती विभाग एकूण - ६२१.५ - १००.४
..
औरंगाबाद विभाग
औरंगाबाद - ५२७.५ - १२२.३
जालना - ६६६.३ - १४४.४
बीड - ५७१.५ - १४५.०
लातूर - ५९५.० - ११३.३
उस्मानाबाद - ४९४.० - ११८.१
नांदेड - ७९१.१ - १२२.३
परभणी - ७१६.० - १२०.९
हिंगोली - ७०८.६ - ११०.६
औरंगाबाद विभाग एकूण - ६३७.८ - १२४.२
..
कोकण विभाग
ठाणे - १९५०.३ - ९३.१
रायगड - २६५१.४ - ९६.९
रत्नागिरी - ३४१३.४ - १२१.९
सिंधुदुर्ग - ३१०७-५ - ११८.९
पालघर - १९७७.१ - ९९.५
एकूण कोकण विभाग - २७६३.९ - ११०.९
..
नागपूर विभाग
वर्धा - ६६३.५ - ९२.२
नागपूर - ६७५.१ - ८९.८
भंडारा - ७९७.८ - ८३.१
गोंदिया - ७८९.७ - ७७.३
चंद्रपूर - ९६७.० - १०७.०
गडचिरोली - ८००.२ - ७५.१
एकूण नागपूर विभाग - ७७४.३ - ८६.३
..
नाशिक विभाग
नाशिक - ५०१.१ - ६६.८
धुळे - ३५६.२ - ८४.२
नंदुरबार - २८०.३ - ३९.३
जालना - ४१७.४ - ८२.२
अहमदनगर - ३७४.७ - १२४.४
एकूण नाशिक विभाग - ४०७.० - ७३.३
..
पुणे विभाग
पुणे - ५४०.८ - ७६.७
सोलापूर - ३५९.२ - ११७.८
सातारा - ७६२.३ - १०५.०
सांगली - ५९६.० - १५८.६
कोल्हापूर - १२७९.० - ८३.४
एकूण पुणे विभाग - ६९०.९ - ८९.३
..........................
(जोड आहे...)