कळमेश्वर : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सोयाबीन व शेतीशाळा, मग्रारोहयो फळबागेला भेट देऊन तपासणी केली व मार्गदर्शन केले़. कृषी विभाग नागपूरचे पालक संचालक सुभाष नागरे, रवींद्र भोसले, मिलिंद शेंडे, काटोलचे उपविभागीय कृषी अधिकारी योगीराज जुमडे यांनी उपरवाही, खैरी (हरजी) येथे गळीत धान्य व तेलताड अभियान पीक प्रात्यक्षिक प्रकल्प, सलग सोयाबीन व शेतीशाळा, मग्रारोहयो फळबागांना भेटी देऊन तपासणी केली़.
शेतकरी सुनंदा सालोटकर, तेलपाल जाधव, गणपत राजुरकर, तारकेश्वरी उमरे यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली़. गणेश कुहीटे यांच्या शेतातील दालमिल प्रक्रिया उद्योगाला भेट दिली व मार्गदर्शन केले. आदर्श रोपवाटिका गोंडखैरी येथेदेखील भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी जगदिश नेरलवार, संजय कुहीटे, राहुल राऊत, गुलाले, फलके यांची उपस्थिती होती़; तसेच मंडळ कृषी अधिकारी यांनी गोवरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली़ याप्रसंगी त्यांच्यासोबत नरेंद्र निंबुळकर, मेघराज निंबुळकर, तुषार निंबुळकर यांची उपस्थिती होती़.