शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सरकारी अनास्थेचा ‘एम्स’ ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 3:13 AM

जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा व शिक्षण मिळावे म्हणून केंद्राने नागपुरात आयुर्विज्ञान संस्था (एम्स) करण्याचे ‘व्हिजन’ दाखवले.

‘एमएडीसी’कडून आरोग्य मंत्रालयाला जागेचे हस्तांतरणच नाहीसुमेध वाघमारे नागपूर जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा व शिक्षण मिळावे म्हणून केंद्राने नागपुरात आयुर्विज्ञान संस्था (एम्स) करण्याचे ‘व्हिजन’ दाखवले. मात्र, गेल्या दीड वर्षांत सरकारी अनास्थेमुळे मिहानमधील १५० एकरची जागा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन सेवा मंत्रालयाकडे हस्तांतरितच झाली नाही. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हल्पमेंट कंपनी (एमएडीसी) केवळ ‘अ‍ॅडव्हान्स पजेशन’ पत्र देऊन हात वर करीत आहे. दोन हजार कोटींचा निधी मंजूर असताना लालिफितीच्या मनमानी कारभारात ‘एम्स’ अडकले आहे.गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात देशात चार नवीन एम्स उभारण्याच्या निर्णयानंतर आॅगस्ट २०१४ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ‘एम्स’ होत असल्याची घोषणा केली. मिहान आणि मेडिकलचा टीबी वॉर्ड असे दोन्ही ठिकाणी ‘एम्स’चा विचार सुरू झाला. याला घेऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव के. सी. सामरिया यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय पथकाने या दोन्ही जागेची पाहणी केली.या पाहणीत त्यांनी टीबी वॉर्डाच्या जागेला जागेवरच नापसंती देत मिहानच्या जागेला मान्यता दिली. मे महिन्यात मुंबईमध्ये ‘एम्स’ व ‘एमएडीसी’ प्रतिनिधींची बैठक झाली. यात मिहानमधील ‘सेझ’ बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याआधारे ‘गोल्फ कोर्स’साठी राखीव ठेवण्यात आलेल्या १५० एकर जागेवर ‘एम्स’ उभारण्याला मंजुरी देण्यात आली. तर बांधकामाची जबाबदारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन सेवा मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटंसी कॉर्पाेरेशन लिमीटेड’ला, (एचएससीसी) देण्याचाही निर्णय घेण्यात आला. ‘एचएससीसीकडे’ जागा हस्तांतरण करण्यापूर्वी प्रस्तावित जागेवर वीज, पाणी व चौपदरी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या केंद्र सचिवांच्या निर्देशावर या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु दरम्यानच्या काळात ‘एमएडीसी’ने १५० एकर जागेचे हस्तांतरण ‘मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अ‍ॅण्ड फॅमिली प्लॅनिंग’कडे केलेच नाही. आता हस्तांतरणाला उशीर का, असा प्रश्न ‘एमएडीसी’ला विचारला जात असल्याने, ठरल्याप्रमाणे एक रुपया दराने ‘लीज’चे पैसे मिळणार नाही तोपर्यंत हस्तांतरण होणार नाही, असे कारण समोर केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेलाही ‘खो’राज्य शासनातर्फे ‘एम्स’ला मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होईल व भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ नोव्हेंबर २०१५ रोजी नागपुरातील टिळक पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही ‘एमएडीसी’ जागेच्या हस्तांतरणासाठी वेळ घालवित असल्याचा आरोप होत आहे.जमिनीचा दर मिळणार नाही, तोपर्यंत हस्तांतरण नाहीजमिनीचा निश्चित केलेला दर जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत जागेचे कसे हस्तांतरण करायचे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास वित्त विभागात तो पाठविला जाईल.-व्ही.एम. पाटीलउपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी