लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’च्या माध्यमातून शहर बस सेवा चालविण्यात येत आहे. विविध मार्गांवर वातानुकूलित ‘ग्रीन बस’देखील धावत आहे. मात्र वर्षभराच्या कालावधीत ‘ग्रीन बस’मुळे थोडाथोडका नव्हे तर एक कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. नागपूर शहरात मनपाच्या किती बस चालत आहेत, ‘आपली बस’कडे किती चालक व वाहक आहेत, मनपाला ‘आपली बस’च्या माध्यमातून २०१७-१८ या आर्थिक वर्षात किती रक्कम मिळाली, ‘ग्रीन बस’मुळे किती महसूल मिळाला तसेच भ्रष्टाचार करताना किती कर्मचारी आढळले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मनपाच्या ३७५ बसेस शहरात चालत आहेत. सद्यस्थितीत चार आॅपरेटर ‘आपली बस’सेवा चालवत आहेत. मनपाचा एकही कर्मचारी बससेवेत नाही. कंत्राटदारातर्फे १,०८० चालक व १,४४९ वाहक नियुक्त करण्यात आले आहेत.वातानुकूलित ‘ग्रीन बस’च्या माध्यमातून फेब्रुवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मनपाला १ कोटी ३ लाख ३७ हजार ९५२ इतकी रक्कम प्राप्त झाली. तर १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत १ कोटी ७ लाख ८१ हजार ८३ रुपयांचा तोटा दाखविण्यात आला.नफ्याच्या तुलनेत खर्च अतिशय कमी२०१७-१८ या केवळ एका वर्षाच्या कालावधीत मनपाला बससेवेच्या माध्यमातून ६१ कोटी २ लाख ९४ हजार ३३२ रुपयांची रक्कम प्राप्त झाली. तर १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत परिवहन सेवेवर मनपाचे ३ कोटी १७ लाख ८४ हजार ७८६ रुपये खर्च झाले. शहरातील अनेक मार्गांवर बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. शिवाय अनेक बसेसची अवस्थादेखील फारशी चांगली नाही. अशा स्थितीत इतकी जास्त रक्कम प्राप्त होऊनदेखील मनपाकडून परिवहन सेवेवर त्या तुलनेत फारच कमी निधी खर्च झाला आहे.८९ कर्मचारी बडतर्फ‘आपली बस’मध्ये कर्मचारी अनेकदा तिकिटांचा अपहार करतात अशी सामान्य नागरिकांची तक्रार असते. १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षात तिकिटांचा अपहार किंवा भ्रष्टाचार करताना ६७५ कंत्राटी कर्मचारी सापडले. यातील ८९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
उपराजधानीतील वातानुकूलित ‘ग्रीन बस’ तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 7:54 PM
उपराजधानीत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’च्या माध्यमातून शहर बस सेवा चालविण्यात येत आहे. विविध मार्गांवर वातानुकूलित ‘ग्रीन बस’देखील धावत आहे. मात्र वर्षभराच्या कालावधीत ‘ग्रीन बस’मुळे थोडाथोडका नव्हे तर एक कोटींहून अधिक रकमेचा तोटा झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
ठळक मुद्देवर्षभरात एक कोटीहून अधिक तोटा : भ्रष्टाचार करताना ‘आपली बस’चे ६७५ कर्मचारी आढळले