शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

‘जिव्हाळा’ला हवाय आधार

By admin | Published: July 10, 2017 1:56 AM

गरीब, वंचित, निराधार, अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिव्हाळा परिवार सेवारत आहे.

होतकरू वंचितांचा निवारा : रद्दी विक्रीतून चालतोय ६० मुलांचा उदरनिर्वाह लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब, वंचित, निराधार, अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिव्हाळा परिवार सेवारत आहे. निव्वळ निवाराच नाही, जगण्याच्या जडणघडणीत लागणाऱ्या सर्व सोयी या मुलांना जिव्हाळा पुरवीत आहे. मुलांना प्रकाशपर्वाकडे घेऊन जाणाऱ्या या जिव्हाळ्याचा मुख्य स्रोत केवळ रद्दीची विक्री आहे. गेल्या पाच वर्षांपासून नागेश पाटील आणि त्यांचे सहकारी हे सेवाकार्य अव्याहतपणे करीत आहेत. आज जिव्हाळा ६० सदस्यांचा झाला आहे. त्यामुळे गरजाही वाढल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी दानशूरांकडून सायकलींच्या मदतीची अपेक्षा आहे.वंजारीनगर येथे प्लॉट नं. ३८ मध्ये जिव्हाळा परिवाराचा निवारा आहे. येथे परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यात येत आहेत. विदर्भातील १० मुली आणि अरुणाचल प्रदेशातील ५० मुले-मुली जिव्हाळ्यात वास्तव्यास आहेत. पाचव्या वर्गापासून ते बारावीचे शिक्षण ते घेत आहेत. १४ मुली या नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. दोन मुली मेडिकलची तयारी करीत आहेत. जिव्हाळा चालतोय तो रद्दीच्या विक्रीतून; दान पारमिता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे समाजातील सहहृदयी लोकांना घरातील वृत्तपत्राची रद्दी देण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते. या रद्दी संकलनातून गोळा झालेल्या निधीतून या मुलांचा शैक्षणिक खर्च, त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि निवाऱ्यावर खर्च होतो. विशेष म्हणजे हे ६० मुलांचे कुटुंब जिथे राहते, ते घरसुद्धा किरायाचे आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबाची दोनवेळचे पोट रद्दीच्या संकलनातून भरत आहे. परंतु शाळेचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्च त्यांना काहीसा डोईजड होतो आहे. त्यासाठी जिव्हाळा परिवारातील अविनाश संगवई, मीना पाटील, विनया फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. तरीसुद्धा काही बाबतीत कमतरता भासत आहे. या विद्यार्थ्यांना हव्यात सायकलीहे मुले-मुली न्यू इंग्लिश हायस्कूल, दीनानाथ विद्यालय या शाळांमध्ये शिकत आहेत. या मुलांना शाळेत पायी जावे लागते. घरात कुटुंब मोठे असल्याने झोपायचीही गैरसोय होते. मुलांच्या या छोट्या-मोठ्या गरजांच्या पूर्ततेसाठी समाजाकडून मदतीचा आधार हवा आहे. या मुलामुलींसाठी २० सायकलीची गरज आहे. नवीन असायलाच पाहिजे अशातला भाग नाही; सोबतच १५ गाद्या व ब्लँकेटची गरज आहे. हे छोटेसे आवाहन जिव्हाळा परिवाराचे समाजाला आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. परिवाराचे सचिव नागेश पाटील यांच्या ९७६३१५५८८५ यांच्याशी आपण संपर्क करू शकता अथवा एचडीएफसी बँकेच्या मानेवाडा शाखेतील २४५१७६२०००००२५ या खात्यातही मदत देऊ शकता.