शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

एअरफोर्सला १.६ कोटींचा गंडा

By admin | Published: January 02, 2015 12:50 AM

बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच

बनावट चेकने रक्कम केली वळती : पोलिसांनी गोठवली खातीनागपूर : बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत ही रक्कम काढून घेणाऱ्या आरोपींची दोन खाती गोठवली. त्यामुळे १ कोटी ३८ लाखांची रोकड बचावली आहे.वायुसेनेला जबरदस्त हादरा देणारी ही घटना ३१ डिसेंबरला उजेडात आली. कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगारासाठी नेहमीप्रमाणे महिन्याच्या अखेरीस प्रत्येक युनिटच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वायुसेनानगर शाखेत नेहमीप्रमाणे एअरफोर्स युनिटच्या खात्यात रक्कम जमा झाली.अधिकाऱ्यांनी केली चौकशी नागपूर : लेखा विभागातून ही रोकड काढण्यासाठी धनादेश पाठविण्यात आला. मात्र, ‘इनसफिशियन्ट बॅलेन्स’ असा शेरा मारून बँक अधिकाऱ्यांनी हा धनादेश परत पाठविला. त्यामुळे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ०३८२४३ क्रमांकाच्या धनादेशाद्वारे १४ लाख ५४ हजार ३०० रुपये आणि ०३८२४४ क्रमांकाच्या धनादेशामार्फत १ कोटी ८१ लाख ४७ हजार ८०० असे एकूण १ कोटी ९६ लाख ०२,१०० रुपये काढून घेण्यात आल्याचे उघड झाले. त्याची माहिती लेखा विभागातील अधिकाऱ्यांकडून स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांना देण्यात आली. या प्रकारामुळे वायुसेना विभागाला जबर हादरा बसला. शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी दिवसभर विचारमंथन केल्यानंतर वायुसेनेचे सहायक सुरक्षा अधिकारी सुनील गोपालकृष्ण पल्लीथाली (वय ४८) यांनी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी वरिष्ठांना ही माहिती देऊन लगेच तपास सुरू केला.(प्रतिनिधी)नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळअतिसंवेदनशील वायुसेनेच्या गेटवरही बाहेरचा व्यक्ती उभा राहू शकत नाही तेथे लेखा विभागातील चेकची माहिती मिळवण्यापासून तो तयार करण्यापर्यंतचे काम कोण करू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडविणाऱ्या या प्रकरणात ‘घर का भेदी’ असावा, असा पोलिसांना संशय आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने ‘त्या’ बँकेत खाते उघडले आहे, त्यातील एकाचे आडनाव झा आहे. मात्र ते नाव बोगस असावे, असा कयास आहे. चेकचे झाले स्कॅनिंगपोलिसांच्या माहितीनुसार, ज्या बनावट चेकच्या माध्यमातून ही रक्कम वळती करण्यात आली ते चेक वायुसेनेच्या लेखाविभागातच आहे. त्याचे स्कॅनिंग करून बनावट चेक तयार करण्यात आले आणि रक्कम एका सरकारी मान्यताप्राप्त खासगी बँकेच्या गड्डीगोदाम (सदर) शाखेतील दोन वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यात आली.