फुटाळ््यावर ‘इंद्रधनुष’चे संगीतमय सादरीकरणनागपूर : अनुरक्षण कमान मुख्यालय, वायुसेनानगरतर्फे भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापन समारोहाच्या शृंखलेचा समारोप रविवारी ‘इंद्रधनुष’च्या संगीतमय कार्यक्रमाने झाला. अनुरक्षण कमान नंबर ५ च्या वायुसेना बँड पथकाद्वारे सादर केलेले वाद्ययंत्रावरील संगीत फुटाळा तलावावर आलेल्या पर्यटक आणि तरुणाईसाठी रोमांचक अनुभव ठरला. पथकाने सादर केलेले संगीताचे शिस्तबद्ध आयोजन, वायुसेनेपासून दूर जाणाऱ्या तरुणाईला पुन्हा वायुसेनेकडे वळविण्यासाठी आणि जनसामान्यांमध्ये देशभक्ती जागविण्यासाठी करण्यात आले.वायुसेनेच्या बँडने देशभक्तीपर गीतांसह हिदंी चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या गीतांच्या धुन दर्शकांसमोर सादर केल्या. यात वेस्टर्न गाण्यांचे संगीतही होते. फ्युजन डान्सवरील संगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सादर झालेल्या ए.आर. रहमानच्या ‘वंदे मातरम...’ने उपस्थित तरुणाईलाही रोमांचित केले. यासह ‘ब्राझील..., हम तेरे बीन.., दिल संभल जा जरा.., रोजा.., सिम्फनी40.., तुही मेरी शब है...’ या गीतांचे संगीत मंत्रमुग्ध करणारे ठरले. ‘मेरा नाम चिन चिन चु...’ व ‘झुबी डुबी...’ च्या संगीताने दर्शकांना थिरकायला लावले. खास सैनिकी अंदाजातील ‘कंधोसे कंधे मिलते है...’च्या संगीताने पुन्हा रोमांच जागविला. प्रत्येक गीतांच्या संगीतात खास सैनिकी शिस्तबद्धता दर्शविणारी शैली होती. सार्जन्ट एलेक्स मोनच्या बासुरीवरील ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ने सीमेवरील सैनिकांची आठवण ताजा केली. ट्रॅम्पेट, हॉर्न, ड्रम, आॅक्टोपॅडवरील वाद्यवृदांनी मूळ संगीतात सैनिकी बाज समायोजित केल्याने हे सादरीकरण अनोखे ठरले. अनुरक्षण कमानचे कमांडिंग-इन-चीफ एअरमार्शल जगजीत सिंग या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. वायुसेनेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह फुटाळ्यावर आलेले हजारो नागरिकांनी इंद्रधनुषचा संगीतमय सोहळा अनुभवला. लुभना अहमद व कॅप्टन मुजफ्फर युनुस यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
वायुसेनेची तरुणाईला साद
By admin | Published: October 19, 2015 2:42 AM